शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक पाप हा घटनात्मक गुन्हा ठरेलच असे नाही - सुप्रीम कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2018 01:36 IST

आधी समलैंगिकतेसंदर्भात स्वत:च दिलेला निर्णय बदलताना सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने गुरुवारी स्पष्ट केले की, राज्यघटनेने प्रत्येक नागरिकास दिलेल्या मूलभूत हक्कांचे रक्षण करणे न्यायालयाचे कर्तव्य आहे.

नवी दिल्ली : आधी समलैंगिकतेसंदर्भात स्वत:च दिलेला निर्णय बदलताना सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने गुरुवारी स्पष्ट केले की, राज्यघटनेने प्रत्येक नागरिकास दिलेल्या मूलभूत हक्कांचे रक्षण करणे न्यायालयाचे कर्तव्य आहे. एखाद्या कायद्याने एका जरी व्यक्तीच्या मुलभूत हक्काची पायमल्ली होत असेल तर असा कायदा राज्यघटनेच्या निकषावर टिकू शकत नाही.न्यायालयाने म्हटले की, सामाजिक नीतिमत्ता आणि घटनात्मक नीतिमत्ता यात फरक आहे. एखादी कृती सामाजिक नीतिमत्तेनुसार पाप मानले जात असले तरी घटनात्मक नीतिमत्तेत तो गुन्हा ठरेलच असे नाही. देशाची राज्यघटना हा जिवंत दस्तावेज असून, त्यातील तरतुदींचे अर्थ आणि संदर्भ बदलत्या काळानुसार बदलत राहायला हवेत. प्रचलित कायद्यांमध्ये बदलाचे काम लोकनियुक्त सरकारने वा संसदेने न केल्यास न्यायालयास हस्तक्षेप करून त्या कायद्यांमधये घटनात्मक मूल्यांनुसार बदल करणे न्यायालयास क्रमप्राप्त आहे.‘नाल्सा’ प्रकरणात न्यायालयाने तृतीयपंथी व्यक्तींना स्वतंत्र लिंग बहाल करून समान नागरिकत्व बहाल केले होते. गेल्याच वर्षी न्या. पुट्टास्वामी प्रकरणात न्यायालयाने खासगी जीवन आपल्या मनानुसार जगणे (प्रायव्हसी) हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क असल्याचे जाहीर केले होते. आताचा निकाल हे व्यक्तिस्वातंत्र्याच्या त्याच मार्गावर टाकलेले पुढचे पाऊल आहे. ब्रिटिशांनी स्वत:च्या देशात हा कायदा केव्हाच रद्द केला, परंतु भारताने राज्यघटना स्वीकारून ६६ वर्षे झाली तरी हे वसाहतवादी लोढणे गळ््यात वागवावे, हे अशोभनीय असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.समलैंगिकता हा गुन्हा नाही, या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे अशा संबंधाच्या पुरस्कर्त्यांनी स्वागत केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची आमची प्रतीक्षा संपली. आता आम्ही खुलेपणाने समाजात वावरू, आम्ही गुन्हेगार नाही, अशा शब्दांत त्यांनी आनंद व्यक्त केला. अनेकांच्या डोळ्यांत तर आनंदाश्रू दिसले.गैरसमज निवळण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय होता, असे या पुरस्कर्त्यांनी बोलून दाखवले. आम्ही गेली १८ वर्षे या निर्णयाची वाट पाहत होतो, न्यायालयाचे आभार मानतो, असेही अनेकांनी बोलून दाखवले. आता आम्ही अत्याचाराविरोधात न्यायालये व पोलिसांकडे बिनधास्त जाऊ शकतो, असे त्यांचे म्हणणे होते.

काँग्रेसकडून स्वागतकाँग्रेसने समलैंगिकतेसंदर्भात न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे. या निकालामुळे भारतीय समाजात अधिक समताव सर्वसमावेशकता निर्माण होईल अशी अपेक्षा काँग्रेसने व्यक्त केली आहे.चिरडता येणार नाहीतराज्यघटनेने या देशात कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्याचे अभिवचन दिले आहे व ते फक्त संवैधानिक नीतिमत्तेनेच प्रस्थापित होऊ शकते. बहुढंगी व समावेशक समाजाची स्थापना करून त्याचे रक्षण करणे हे संवैधानिक नीतीमत्तेचे ध्येय आहे. संख्येने अत्यल्प असलेल्या समाजवर्गाचे नैसर्गिक लैंगिक हक्क बहुसंख्यांना पसंत नाहीत म्हणून चिरडून टाकता येणार नाहीत.-सर्वोच्च न्यायालयनिर्णयाशी सहमतआम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाशी सहमत आहोत. समलैंगिकता गुन्हा ठरू शकत नाही, असे आम्हाला वाटते. परंतु, समलैंगिक विवाह व संबंध नैसर्गिक नाही व अपेक्षित देखील नाही. त्यामुळे आम्ही अशा संबंधांचे समर्थन करीत नाही.- अरुणकुमार, प्रचार प्रमुख,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय