जयपूर - 2019 साली होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सुमारे 90 कोटीहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. काही महिन्यांवर आलेल्या या निवडणुकीमध्ये सोशल मीडिया महत्त्त्वाची भूमिका वर्तवेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काळात राजकीय पक्षांमध्ये सोशल मीडियावरील लढाई तीव्र होणार आहे.2014 साली झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि भाजपाने सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करून घेतला होता. मात्र गेल्या चार वर्षांत इतर राजकीय पक्षांनीही सोशल मीडियावर आपले बस्तान बसवले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष प्रचाराबरोबरच सोशल मीडियावरही प्रचाराचा जोर दिसण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत तीन राज्यांमध्ये दणदणीत यश मिळवल्याने काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांचा उत्साह दुणावला आहे. लोकसभेसाठी 2019 च्या एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया चालण्याची शक्यता आहे. तसेच फेसबूक, व्हॉट्सअॅप, ट्विटरसह सोशल मीडियावरील इतर संकेतस्थळांवरून होणारा प्रचार या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतामध्ये सुमारे 90 कोटी मतदार आहेत. त्यापैकी सुमारे 50 कोटी मतदारांपर्यंत इंटरनेट पोहोचले आहे. भारतात सुमारे 30 कोटी फेसबूक युझर्स आहेत. तसेच 30 कोटी युझर्स व्हॉट्सअॅप वापरतात. तसेच अन्य सोशल मीडिया साइट्वरही मोठ्या प्रमाणावर मतदार अॅक्टिव्ह आहेत.
2019 च्या निवडणुकीत 90 कोटी मतदारांना प्रभावित करणार सोशल मीडिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 22:05 IST
2019 साली होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सुमारे 90 कोटीहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. काही महिन्यांवर आलेल्या या निवडणुकीमध्ये सोशल मीडिया महत्त्त्वाची भूमिका वर्तवेल
2019 च्या निवडणुकीत 90 कोटी मतदारांना प्रभावित करणार सोशल मीडिया
ठळक मुद्दे 2019 साली होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सुमारे 90 कोटीहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेतकाही महिन्यांवर आलेल्या या निवडणुकीमध्ये सोशल मीडिया महत्त्त्वाची भूमिका वर्तवेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहेभारतात सुमारे 30 कोटी फेसबूक युझर्स आहेत. तसेच 30 कोटी युझर्स व्हॉट्सअॅप वापरतात. तसेच अन्य सोशल मीडिया साइट्वरही मोठ्या प्रमाणावर मतदार अॅक्टिव्ह आहेत