शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

सोशल मीडियावरच्या तुमच्या पोस्टवर आता असणार सरकारचा 'वॉच'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 02:10 IST

2019ची लोकसभा निवडणूक आणि 2018मध्ये होणा-या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार आता सोशल मीडियावर करडी नजर ठेवणार आहे.

नवी दिल्ली- 2019ची लोकसभा निवडणूक आणि 2018 मध्ये होणा-या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकार आता सोशल मीडियावर करडी नजर ठेवणार आहे. सरकारने सोशल मीडियाचा होत असलेला दुरुपयोगाचा मुद्दा गंभीररीत्या घेतला आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून निवडणुकांमध्ये होणारा हस्तक्षेप किंवा गैरवापरास आळा बसणार आहे. सरकारी त्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सूचना आणि प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी अर्जेंटिनाच्या साल्टामध्ये आयोजित जी-20 डिजिटल इकॉनॉमी मिनिस्ट्रियल बैठकीला संबोधित करताना म्हटले आहे.लोकशाही पद्धतीत होणा-या पारदर्शकतेशी कधीही तडजोड केली जाणार नाही. भारताच्या निवडणुकांमध्ये सोशल मीडिया हा कळीचा मुद्दा ठरतोय. अनेक निवडणुकांमध्ये सोशल मीडियाच्या हस्तक्षेपाबाबतही सरकारनं चौकशी सुरू केली आहे. तसेच यासंदर्भात आणखी कडक पावलं उचलणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. तर, सीबीआयनं ब्रिटिश कंपनी असलेल्या केंब्रिज अनॉलिटिकाच्या विरोधातही कारवाईला सुरुवात केली आहे.या कंपनीवर फेसबुकच्या माध्यमातून 5 कोटी भारतीय युझर्सचा डेटा चोरल्याचा आरोप आहे. तसेच इंटरनेटचा होत असलेला दुरुपयोग रोखण्यासाठी कडक उपाययोजना केल्या जातील. जेणेकरुन कट्टरता पसरवणा-या लोकांना सायबर क्राइमच्या माध्यमातून पायबंद घातला जाईल. इंटरनेटचा होत असलेला दुरुपयोग रोखण्याचं एक आव्हान असून, त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरुनही सहकार्याची अपेक्षा आहे, असंही प्रसाद म्हणाले. सायबर हल्ल्यांपासून देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करू, डेटा सुरक्षा आणि व्यक्तिगत माहिती चोरीच्या प्रकरणावर उपाययोजना करण्याचं आश्वासनही या कार्यक्रमात बोलताना त्यांनी दिले.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅपSocial Mediaसोशल मीडिया