निकालावर असंतोष व्यक्त करणा-या खोचक प्रतिक्रियांनी व्यापला सोशल मीडिया
By Admin | Updated: December 10, 2015 16:36 IST2015-12-10T16:36:24+5:302015-12-10T16:36:24+5:30
सलमानला हायकोर्टानेही दोषी धरले असते तर माझा पैशावरील विश्वास उडला असता, किंवा २००२मध्ये सलमान ड्रायव्हररहित कारचा पहिला मालक होता अशा प्रकारच्या कमेंट्सचा

निकालावर असंतोष व्यक्त करणा-या खोचक प्रतिक्रियांनी व्यापला सोशल मीडिया
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - सलमानला हायकोर्टानेही दोषी धरले असते तर माझा पैशावरील विश्वास उडला असता, किंवा २००२मध्ये सलमान ड्रायव्हररहित कारचा पहिला मालक होता अशा प्रकारच्या कमेंट्सचा सोशल मीडियावर पूर आला होता. टिवटरच्या ट्रेंडिंगमध्ये कोर्टाच्या निकालानंतर तासाभरातच #Salmanverdict हा हॅशटॅग टॉपवर आला तर फेसबुकवरही लाखो नेटिझन्स सलमान खान सर्च करत होते. सलमान खानची गुन्ह्यातून मुक्तता केल्यामुळे न्यायव्यवस्थेवर आदर दाखवणारे काही चाहते होते, परंतु प्राबल्य होते न्यायालयाच्या निर्णयावर असमाधान व्यक्त करणा-या खोचक प्रतिक्रियांचे.
सोशल मीडिया काही निवडक प्रतिक्रिया:
- मोदी आणि सलमान खान दोघांचीही २००२च्या खटल्यातून सुटका.
- आणि शेवटी आम्ही अशा निष्कर्षाला आलो आहोत की गाडी भूत चालवत होतं.
- जरा आमच्या सहिष्णूततेची मर्यादा बघा. सलमानने गुन्हा केलाय हे आम्हाला माहित्येय तरी आम्ही शांत आहोत.
- कारच दारू प्यायलेली होती. पोलीसांनी कारच्या विरोधात गुन्हा दाखल करायला हवा होता.
- या देशात तुम्हाला न्याय विकत घेता येतो. तुमच्याकडे फक्त फाइव्ह स्टार वकिल नेमण्यासाठी २० कोटी रुपये असायला हवेत.
- आज एक गोष्ट शिकायला मिळाली. तुम्ही कुठला गुन्हा केलाय हे फारसं महत्त्वाचं नाही. सत्ताधारी पक्षाशी हातमिळवणी करायला विसरू नका.
- असे निकाल दिले गेले तर लोकांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास कायम राहील असं कसं मानायचं?
- ज्या ज्या वेळी तुम्हाला खूप मोठी, महागडी गाडी रस्त्यावरून येताना दिसेल, तेव्हा चूपचाप बाजुला व्हा. तुमच्या किरकोळ आयुष्याला भारतात काही किंमत नाहीये.
- भारतीय न्यायव्यवस्थेला IPC 302 अंतर्गत न्यायाचा खून केल्याबद्दल दोषी धरायला हवं.
- पैसा आणि स्टारडम यांच्यावरील विश्वास दृढ झाला.
- सलमान भाई नाही, गरीबी दोषी आहे.
- सलमान हायकोर्टाला विचारतो... हम आपके है कौन. हायकोर्ट म्हणतं हम साथ साथ है.