शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सोशल मीडियामुळे भाजपा बचावात्मक पवित्र्यात, टीकेमुळे सत्ताधा-यांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 04:27 IST

ज्या सोशल मीडियावर तीन वर्षे अधिराज्य गाजवले, तेच व्यासपीठ आता भाजापासाठी चिंतेचा विषय बनले आहे. त्या माध्यमावरून भाजपावर टीकास्त्र सुरू झाल्यामुळे अशा संदेशांवर विश्वास ठेवू नका, असे सांगण्याची पाळी भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांच्यावर आली.

सुरेश भटेवरा नवी दिल्ली : ज्या सोशल मीडियावर तीन वर्षे अधिराज्य गाजवले, तेच व्यासपीठ आता भाजापासाठी चिंतेचा विषय बनले आहे. त्या माध्यमावरून भाजपावर टीकास्त्र सुरू झाल्यामुळे अशा संदेशांवर विश्वास ठेवू नका, असे सांगण्याची पाळी भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांच्यावर आली.पेट्रोल डिझेलच्या किमती अलीकडेच वाढल्या, तेव्हा मोदी, सुषमा स्वराज, धर्मेंद्र प्रधान, स्मृती इराणी आदी नेत्यांचे भाववाढीच्या विरोधातले जुने ट्विट्स व धरणे निदर्शनांची छायाचित्रे, त्यांच्या सध्याच्या निवेदनापेक्षाही अधिक शेअर केले गेले आणि रीट्विट होत आहेत. गुजरात विधानसभेच्या प्रचारात तर काँग्रेसने भाजपाच्याच जुन्या पोस्टर्सचा आधार घेत आपले प्रचार अभियान आखले आहे. याच मालिकेतले ‘विकास पागल हो गया है’ हे अभियान गुजरातामधे सध्या विशेष चर्चेत आहे. सत्ताधारी पक्षाला नेहमीच इतर पक्षांपेक्षा अधिक टीका सहन करावी लागते. भाजप त्यामुळेच सध्या अधिक चिंतेत आहे.आरोप प्रत्यारोपांच्या राजकीय टोलेबाजीखेरीज, देशाच्या सुरक्षेसाठीही समाज माध्यमे सरकारच्या चिंतेचा विषय बनला आहे. गृहमंत्री राजनाथसिंगांनी सोशल मीडियावर राष्ट्रविरोधी कंटेटचे प्रमाण खूपच वाढले आहे, असे मत अलीकडेच व्यक्त केले.फेसबुक व व्टीटरवरील किमान ४00 कंटेट व १00 अकाउंट्स सरकारने बंद करण्यास भाग पाडले. काश्मीरमधे दहशतवादी गटांचे नेटवर्कच व्हॉटस अ‍ॅपवर चालते. सोशल मीडियावरील अफवांमुळे निर्माण होतो व तमाम दंगली त्यामुळेच भडकतात, असा सरकारी सूत्रांचा दावा आहे.>खरे तर नरेंद्र मोदींना २0१४ साली ऐतिहासिक विजय संपादनकरून देण्यात सोशल मीडियाच्या व्यासपीठाचाच सर्वात मोठा सहभाग होता. तेच माध्यम सध्या अनेक शंका व वादांचे केंद्र बनले आहे. या माध्यमाची विश्वासार्हता त्यामुळेच पणाला लागली आहे.>जुना खेळ आला अंगाशीसोशल मीडियावर २0१४ पर्यंत भाजपाचा बराच दबदबा होता. दिल्लीत केजरीवाल यांच्या ‘आप’ चा दरम्यान त्यात शिरकाव झाला. कालांतराने काँग्रेससह साºयाच प्रादेशिक पक्षांनी संघटितपणे या माध्यमाचा वापर सुरू केला. त्यामुळे भाजपापुढे मोठेच आव्हान उभे राहिले.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया