शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

तेव्हा मनमोहन सिंग यांचा संताप कुठे होता, अमित शहा यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 22:03 IST

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान तापलेले राजकीय वातावरण प्रचार संपून एक दिवस उलटला तरी शांत होण्याचे नाव घेत नाहीये.

नवी दिल्ली - गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान तापलेले राजकीय वातावरण प्रचार संपून एक दिवस उलटला तरी शांत होण्याचे नाव घेत नाहीये. मोदींनी केलेल्या टीकेला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर आता भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पदाच्या गरिमेचा विचार न केल्याचा आरोप करणारे मनमोहन सिंग आपल्या कार्यकाळात का विसरले होते, असा सवाल केला आहे.अमित शहा म्हणाले, मनमोहन सिंग पंतप्रधान असताना लाखो, कोटींचे घोटाळे होत होते. जेव्हा त्यांचा एक अध्यादेश काँग्रेसचे सध्याचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी फाडला होता, तेव्हा त्यांना पदाच्या गरिमेचा विचार केला होता का, मनमोहन सिंग यांनी याआधीही गुजराथमध्ये प्रचार केला होता. पण सध्याइतके संतप्त ते कधीही दिसले नव्हते. त्यांचा तो स्वभाव नाही. कदाचित यावेळी पक्षाचा दबाव त्यांच्यावर अधिक असावा.   पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आरोप केल्यानंतर डॉ. मनमोहन सिंग यांनी अत्यंत खरमरीत निवेदन प्रसिद्ध केले होते. त्यात ते म्हणतात की, अय्यर यांच्या घरी झालेल्या बैठकीत गुजरात निवडणुकीचा विषय कोणी काढला नाही की त्यावर अजिबात चर्चा झाली नाही. चर्चा फक्त भारत-पाकिस्तान संबंधांपुरतीच मर्यादित होती. त्या बैठकीला जे हजर होते त्यापैकी कोणावरही राष्ट्रद्रोहाचा आरोप केला जाऊ शकत नाही. गेल्या पाच दशकात मी सार्वजनिक जीवनात राहून देशासाठी केलेली सेवा सर्वज्ञात आहे. राजकीय कुरघोडी करण्यासाठी मोदींसह कोणीही माझ्या देशसेवेविषयी दुरान्वयानेही शंका घेऊ शकत नाही, असेही डॉ. सिंग यांनी ठामपणे नमूद केले.

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Amit Shahअमित शाह