...म्हणून बॅनर्र्जींविरुद्ध लढावे लागले-राहुल

By Admin | Updated: April 19, 2016 03:18 IST2016-04-19T03:18:44+5:302016-04-19T03:18:44+5:30

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री बनण्यापूर्वी जी आश्वासने दिली होती ती मुख्यमंत्री बनल्यानंतर पाळली नाही आणि त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत

So there was a fight against Bannerjee- Rahul | ...म्हणून बॅनर्र्जींविरुद्ध लढावे लागले-राहुल

...म्हणून बॅनर्र्जींविरुद्ध लढावे लागले-राहुल

रघुनाथगंज : तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री बनण्यापूर्वी जी आश्वासने दिली होती ती मुख्यमंत्री बनल्यानंतर पाळली नाही आणि त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला त्यांच्याविरुद्ध लढावे लागले, असे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
‘पाच वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये विकास करणे, युवकांना रोजगार देण्यासह ‘परिवर्तन’ घडवून आणण्याचे आश्वासन ममताजींनी दिल्यामुळे काँग्रेसने तृणमूल काँग्रेसला पाठिंबा दिला होता. परंतु मुख्यमंत्री बनताच ममताजींना आश्वासनांचा विसर पडला,’ असे राहुल गांधी म्हणाले. पश्चिम बंगालच्या रघुनाथगंज येथे निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते. (वृत्तसंस्था)

Web Title: So there was a fight against Bannerjee- Rahul