शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Nitin Gadkari: …म्हणून तेव्हा मी माझ्या सासऱ्यांचं घर तोडलं होतं, नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 19:51 IST

Nitin Gadkari: केंद्रातील सत्ताधारी असलेल्या मोदी सरकारमधील रस्ते, महामार्ग आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या कामाची छाप पाडलेली आहे.

केंद्रातील सत्ताधारी असलेल्या मोदी सरकारमधील रस्ते, महामार्ग आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या कामाची छाप पाडलेली आहे. गडकरींच्या नेतृत्वात देशभरात रस्तेबांधणींचं काम युद्धपातळीवर झालं आहे. दरम्यान, आज न्यूज १८ इंडिया या वृत्तवाहिनीच्या चौपाल या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी रस्तेबांधणीच्या कामात येणाऱ्या अडथळ्यांचा उल्लेख केला. तसेच एकदा रस्त्यासाठी सासऱ्यांचं घर तोडण्याचा प्रसंग कसा आला याचा किस्सा सांगितला आहे. 

या मुलाखतीत नितीन गडकरी यांनी विविध मुद्यांवर आपलं मत मांडलं. त्यावेळी तुम्ही महाराष्ट्रात असताना बुलडोझर खूप चालायचा आणि तुमचं खातंही खूप बुलडोझर चालवायचं, अशी विचारणा केली असता नितीन गडकरी यांनी सांगितलं की, हो मी बुलडोझर चालवलाय. तुम्ही नागपूरला आलात तर पाहाल की, नागपूरमधील सर्व रस्ते रुंद आणि प्रशस्त झालेले आहेत. माझा अनुभव आहे की, घर तोडल्यामुळे लोकांचा पाठिंबा जास्त मिळतो. त्यावर  कुठलं असं घर तोडलंय का की ज्यात तुमचं नुकसान झालंय, असं विचारलं असता नितीन गडकरी म्हणाले की, मी माझ्या सासऱ्याचं घर तोडलं होतं.  तेव्हा एक नवीनच महिला आएएस अधिकारी आल्या होत्या. मी त्यांना सांगितलं होतं की, एक चुन्याची रेषा आखा आणि त्याच्या मध्ये येणारी सर्व घरे तोडा. मग पक्ष वगैरे बघू नका, सर्व बांधकामे तोडून टाका. मग काय त्यांनी माझा आदेश पाळला आणि माझ्या सासऱ्यांचं घरही तोडून टाकलं.

मात्र माझ्या सासऱ्यांचं घर मध्ये येत असल्याने ते घर तोडण्याआधी त्यांनी मला कल्पना दिली होती. मात्र मी म्हणालो की, मी तुम्हाला काय सांगितलंय एक चुन्याची रेषा मारा आणि त्याच्या मधील सगळी बांधकामं तोडा. त्यांनी माझ्या आदेशाचं पालन केलं. हे काम कुठल्याही सुडबुद्धीनं केलं नाही. त्यानंतर माझी पत्नी मला म्हणाली की, तुम्ही आधी कल्पना दिली असती तर आम्हीच घर तोडलं असतं. तुम्ही कल्पनाही दिली नाही. हे लोकहिताच्या भावनेतून केलेलं काम होतं. त्यामुळे लोकांनाही आवडलं, असेही गडकरी यांनी सांगितलं. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीnagpurनागपूरFamilyपरिवारPoliticsराजकारण