शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘....तर सुप्रीम कोर्टाला ‘सुप्रीम’ म्हणवून घेण्याचा अधिकार नाही, जोपर्यंत अन्याय होत राहील तोपर्यंत जिहाद…’, मौलाना मदनींचं विधान   

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 16:01 IST

Maulana Mahmood Madani:जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयात घटना सुरक्षित आहे तोपर्यंतच सर्वोच्च न्यायालयाला सर्वोच्च म्हणता येईल, जर असं झालं नाही तर हे नाव लावून घेण्याचा त्याला अधिकार राहणार नाही, असे मौलाना मदनी म्हणाले. 

जमियत उलेमा ए हिंदचे अध्यक्ष मौलाना महमूद मदनी यांनी भोपाळमधील एका कार्यक्रमामधून न्यायालयांनी गेल्या काही काळात दिलेल्या निर्णयांबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच बाबरी मशीद, तिहेरी तलाकसारख्या विषयांवर सरकारने दिलेल्या निर्णयांमधून कोर्ट सरकारच्या दबावात काम करत आहे, असं दिसून येतंय, असा दावा त्यांनी केला. एवढंच नाही तर कोर्टाने दिलेल्या काही निर्णयांमधून घटनेतून देण्यात आलेल्या अल्पसंख्यांकासाठीच्या अधिकारांचं उघडपणे उल्लंघन झालं आहे, असा आरोपही त्यांनी केला.

१९९१ च्या प्रार्थना स्थळ कायद्यानंतरही काही प्रकरणात ज्या प्रकारची कारवाई झाली आहे, हे त्याचं उदाहरण आहे. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयात घटना सुरक्षित आहे तोपर्यंतच सर्वोच्च न्यायालयाला सर्वोच्च म्हणता येईल, जर असं झालं नाही तर हे नाव लावून घेण्याचा त्याला अधिकार राहणार नाही, असे मौलाना मदनी म्हणाले. 

यावेळी जिहादवरूनही त्यांनी मोठं विधान केलं. ते म्हणाले की, आज सरकार आणि प्रसारमाध्यमे एका पवित्र शब्दाला अत्यंत चुकीच्या पद्धतीने जगासमोर मांडत आहेत. लव्ह जिहाद, थूंक जिहाद, जमीन जिहाद अशा शब्दांसोबत जोडून या शब्दाला बदनाम केलं जात आहे. मात्र जिहाद हा नेहमीच पवित्र शब्द राहिलेला आहे. तसेच इतरांचं भलं आणि चांगल्यासाठी सांगितला गेला आहे.

जिथे अन्याय होईल, तिथे जिहाद होईल. भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे. इथे लोकशाही शासनव्यवस्था आहे. इथे जिहादची कुठलीही चर्चा नाही आहे आणि येथील मुस्लिम हे घटनेप्रति निष्ठावंत आहेत, असेही मदनी यांनी सांगितले.  

English
हिंदी सारांश
Web Title : Madani: Supreme Court loses right to 'Supreme' if injustice persists.

Web Summary : Maulana Madani questioned court decisions, alleging government pressure in cases like Babri Masjid and triple talaq. He stated the Supreme Court's legitimacy hinges on upholding the constitution and defended the term 'Jihad' as a sacred concept distorted by media.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयIslamइस्लामIndiaभारत