शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

... म्हणून ज्योतिरादित्य शिंदेंकडून कलम 370 हटविण्याच्या निर्णयाचं समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 13:14 IST

मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा आणि हरयाणातील काँग्रेसचे युवा नेते दिपेंद्रसिंह हुड्डा यांनीही कलम 370 हटविल्याबद्दल मोदी

नवी दिल्ली - केंद्र सरकारने घेतलेल्या जम्मू काश्मीरमधील कलम 370 आणि 35 ए हटविण्याच्या निर्णयाबाबत काँग्रेस अद्यापही संभ्रमात दिसत आहे. काँग्रेसने या निर्णयाला विरोध केला असून काँग्रेसचे काही नेते याचे समर्थनही करत आहेत. त्यामुळे या निर्णयाबाबत विचारविनिमय करण्यासाठी काँग्रेसने दिल्लीत ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला काँग्रेसचे महासचिव, प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते हजर राहणार आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि पक्षाचे महत्त्वाचे नेते राहुल गांधींनी मोदी सरकारच्या  या निर्णयाचा विरोध केला आहे. मात्र, दुसरीकडे मध्य प्रदेशातील काँग्रेसचे नेते आणि राहुल गांधींचे निकटवर्तीय ज्योतिरादित्य शिंदे यांनी कलम 370 हटविल्याचे स्वागत केले आहे.

मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा आणि हरयाणातील काँग्रेसचे युवा नेते दिपेंद्रसिंह हुड्डा यांनीही कलम 370 हटविल्याबद्दल मोदी सरकारचे समर्थन केले आहे.  राहुल गांधींनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर, ज्योतिरादित्य शिंदे यांचे नाव अध्यक्षपदासाठी पुढे आले आहे. त्यातच शिंदे यांनी मोदी सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले आहे, त्यामुळे आगामी राजकारणातील बदलती दिशा आणि काँग्रेस विचारधारा यांकडे हा इशारा तर नाही ना, असा प्रश्न निर्माण होतो.  जेष्ठ पत्रकार दिनेश गुप्ता यांनी शिंदेंच्या समर्थनाला एक विचारपूर्वक केलेली योजना असल्याचं म्हटलं आहे. शिंदे हे कुठल्याही विषयांवर स्वत:चे मत मांडत नाहीत. मात्र, त्यांनी या विषयावर मत मांडले असून विचारपूर्वक आणि नितीचा वापर करत आपले समर्थन दर्शवले आहे. विशेष म्हणजे शिंदे यांचे समर्थन काँग्रेसच्या बदलत्या विचारप्रणालीकडे इशारा करत आहे. कारण, लोकसभा निवडणुकीतील मोठ्या पराभवानंतर काँग्रेसचे युवा नेतृत्व जनमताचा आदर करत आपले समर्थन देत असल्याचे दिसून येते, असेही गुप्ता यांनी म्हटले आहे. 

अल्पसंख्यांक वर्ग हा काँग्रेसचा हक्काचा मतदार होता, पण सद्यस्थितीत अल्पसंख्याक मतदारही काँग्रेसपासून दुरावत आहे. त्यामुळेच, सद्यपरिस्थितीत काँग्रेस कुठलाही धोका पत्करु शकत नसल्यानेच काँग्रेसचे युवा नेतृत्व या विधेयकाचे समर्थन करत आहेत. दरम्यान, ज्या राज्यातील काँग्रेसच्या युवा नेतृत्वाने या 370 कलम हटविण्याच्या विधेयकाचे समर्थन केले आहे, त्या राज्यात आगामी दिवसांत विधानसभा निवडणुका होत आहेत. तर, भाजपाही 370 चा मुद्दा उपस्थित करत या राज्यातील निवडणुकांमध्येसरशी साधण्याचा प्रयत्न करणार आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसArticle 370कलम 370Article 35 Aकलम 35-एNarendra Modiनरेंद्र मोदीMadhya Pradeshमध्य प्रदेश