शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

...तर सिंगल महिलांनाही करता येणार गर्भपात; प्रेग्नन्सी अ‍ॅक्टमध्ये केंद्र सरकार करणार बदल?  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 9:19 AM

आत्ताच्या कायद्यानुसार केवळ 20 आठवड्यांच्या आत गर्भपात केला जाऊ शकतो.

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत एका महत्त्वपूर्ण कायद्यात बदल करण्यासाठी मान्यता मिळू शकते. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी अ‍ॅक्टमधील बदल करण्याला मंत्रिमंडळात मान्यता मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या मते, गर्भनिरोधक उपाययोजना न केल्यामुळे, गर्भपात कायदेशीररित्या वैध करण्यासाठी या कायद्यात बदल केले जाऊ शकतात. विशेष म्हणजे की अविवाहित स्त्रियांसाठी देखील हा कायदा वैध असेल. यामुळे सिंगल महिलांना कायदेशीर चौकटीमध्ये आणि सुरक्षितपणे गर्भपात करणे सोपे होईल.

सध्याचा हा कायदा विवाहित महिलांसाठी सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार गर्भधारणा किंवा नको असलेला गर्भ कायदेशीररित्या गर्भपात करणं केवळ विवाहित महिलांसाठी आहे. कायद्यात बदल केल्यानुसार पालकांनी अल्पवयीन मुलींसाठी गर्भपात करण्याची लेखी परवानगी देणे आवश्यक आहे, तर अविवाहित महिला गर्भनिरोधकाचा परिणाम न झाल्याने गर्भपात करण्याचे कारण देऊ शकत नाहीत.

गर्भपातासाठी वाढवणार कालावधीसूत्रांनी सांगितल्यानुसार, विशेष प्रकरणांमध्ये 20 आठवड्यांपासून 24 आठवड्यांपर्यंत गर्भधारणा करण्याचा प्रस्तावही आहे. यात दिव्यांग आणि अविवाहित महिलांचा देखील समावेश असेल. या व्यतिरिक्त, गर्भामध्ये काही विकृती असल्यास, गर्भधारणेच्या 20 आठवड्यांनंतर कधीही गर्भपात करण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव आहे. आत्ताच्या कायद्यानुसार केवळ 20 आठवड्यांच्या आत गर्भपात केला जाऊ शकतो.

सिंगल महिलांना मिळणार दिलासाकायद्यानुसार, आईच्या जीवाला धोका असल्यास, जर गर्भधारणा बलात्कारामुळे झाली असेल तर,  मुलाचे शारीरिक किंवा मानसिक दुर्बलता, किंवा जर गर्भ निरोधकाचा परिणाम झाला नसेल तर 20 आठवड्यांच्या आत गर्भपात करण्याची परवानगी आहे. सरकारने अविवाहित महिलांसाठी कायद्यात बदल केल्यास सिंगल महिलांच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण असणार आहे.  

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारPregnancyप्रेग्नंसीpregnant womanगर्भवती महिला