शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

...म्हणून मध्य गुजरातमध्ये भाजपाची मदार आता आदिवासी मतांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 11:57 IST

यंदाच्या गुजरात विधानसभा निवडणुकीवर जातीय समीकरणांचा मोठा प्रभाव आहे. मागच्या तीन विधानसभा निवडणुकीच्या  प्रचारात धार्मिक मुद्यांवर भर देण्यात आला होता.

ठळक मुद्दे मध्य गुजरातमध्ये आनंद, खेडा, वडोदरा, पंचमहाल, दाहोद हे जिल्हे आहेत. मध्य गुजरातमध्ये आरक्षणाच्या मुद्यारुन पटेल समाज भाजपावर काही प्रमाणात नाराज आहे.

अहमदाबाद - यंदाच्या गुजरात विधानसभा निवडणुकीवर जातीय समीकरणांचा मोठा प्रभाव आहे. मागच्या तीन विधानसभा निवडणुकीच्या  प्रचारात धार्मिक मुद्यांवर भर देण्यात आला होता. पण मागच्या दोनवर्षात उभ्या राहिलेल्या पटेल आरक्षण आंदोलनामुळे यंदा सर्वच समीकरणेच बदलून गेली आहेत. पहिल्या टप्प्यात कच्छ-सौराष्ट्रमध्ये मतदान पार पडले आता दुस-या टप्प्यात भाजपा आणि काँग्रेस दोघांनी मध्य गुजरावर लक्ष केंद्रीत केले आहे. 

मध्य गुजरातमध्ये विधानसभेच्या एकूण 38 जागा आहेत. मध्य गुजरातमध्ये आनंद, खेडा, वडोदरा, पंचमहाल, दाहोद हे जिल्हे आहेत. 2012 मध्ये भाजपाने मध्य गुजरातमध्ये 38 पैकी 20 जागा जिंकल्या होत्या. यावेळी मध्य गुजरातमध्ये आरक्षणाच्या मुद्यारुन पटेल समाज भाजपावर काही प्रमाणात नाराज आहे. ओबीसी सुद्धा भाजपाला साथ देण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे भाजपाने यंदा मध्य गुजरातमधील आदिवासी मतांवर लक्ष केंद्रीत केले आहे. 

आदिवासी मतदारांना खेचून आणण्यासाठी भाजपाने रणनिती आखून त्यानुसार काम केले आहे. खरतर इथला आदिवासी समाज काँग्रेसचा पारंपारिक मतदार आहे. पण हेच आदिवासी भाजपाच्याही विरोधात नाहीत. त्यामुळे पटेल मते कमी झाल्यास जी तूट निर्माण होईल ती भरून काढण्यासाठी भाजपाने आदिवासी मतांवर लक्ष केंद्रीत केले आहे. मागच्या वर्षी भाजपाने ज्या 20 जागा जिंकल्या होत्या. त्यातील 10 जागा एकटया वडोदरा जिल्ह्यातील होत्या. वडोदरा भाजपाचा बालेकिल्ला आहे.  मध्य गुजरातमध्ये म्हणावा तसा औद्योगिक विकास झालेला नाही. त्यामुळे औद्योगिक विकास, शेतक-यांचे प्रश्न इथेही आहेत. मागच्या 22 वर्षांपासून राज्यात सत्ता असल्याने भाजपाला प्रस्थापित सरकारविरोधी लाटेचाही सामना करावा लागत आहे.  

नरेंद्र मोदी स्वत:च्या हिम्मतीवर गुजरात जिंका गुजरात विधानसभा निवडणुकीत पाकिस्तान हस्तक्षेप करत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्यानंतर या मुद्यावरुन राजकारण तापू लागले आहे. पाकिस्तानने हा आरोप फेटाळून लावताना गुजरात निवडणुकीशी आपला काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. 

भारताने आपल्या राजकीय लढाईत पाकिस्तानला खेचू नये. अशी कटकारस्थान करण्याऐवजी स्वत:च्या हिम्मतीवर निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करावा. आम्ही गुजरात निवडणुकीत हस्तक्षेप करत असल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा आणि निराधार आहे असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मह फैसल यांनी टि्वटमध्ये म्हटले  आहे. 

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा