शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

'... म्हणून राहुल गांधींना मी, 'गांधी-आंबेडकर-भगतसिंगांचा' फोटो भेट दिला'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 8:22 AM

कन्हैया म्हणाला, मला वाटते, की या देशात काही लोक, केवळ लोक नाही, ते एक विचार आहेत. या देशाची चिंतन परंपरा, संस्कृती, इतिहास, वर्तमान आणि भविष्य खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत.

ठळक मुद्देमी गांधी-आंबेडकर आणि भगतसिंग यांचा फोटो त्यांना भेट दिला. कारण, या देशाला आज भगतसिंगांची साथ, आंबेडकरांची समानता आणि महात्मा गांधींच्या एकतेची आवश्यकता आहे.

नवी दिल्ली - कम्युनिस्ट पक्षाचे नेते कन्हैया कुमार आणि अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांनी मंगळवारी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत कन्हैया कुमारने, आपण काँग्रेसमध्ये का सामील झालो हे सांगितले. तसेच, पक्ष प्रवेशापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आम्ही दोघांनाही भेटवस्तू दिल्या. त्यावेळी, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांचा फोटो मी, त्यांना भेट दिल्याचे कन्हैय्याने सांगितले. तसेच, हाच फोटो का भेट दिला हेही कन्हैय्याने स्पष्ट केले. 

कन्हैया म्हणाला, मला वाटते, की या देशात काही लोक, केवळ लोक नाही, ते एक विचार आहेत. या देशाची चिंतन परंपरा, संस्कृती, इतिहास, वर्तमान आणि भविष्य खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी कुठे तरी वाचले होते, की तुम्ही सर्वप्रथम तुमच्या शत्रूची निवड करा. मित्र, अपोआप तयार होतील. तर मी निवड केली आहे. लोकशाही पक्षात आम्ही यामुळे सामील होत आहोत, कारण जर काँग्रेस वाचली नाही, तर देशही वाचणार नाही, असे आता वाटू लागले आहे.  कन्हैया म्हणाला, मी स्पष्टपणे सांगतो, की पंतप्रधान आजही आहेत, कालही होते आणि भविष्यातही होतील. पण, आज आम्ही राहुल गांधींच्या उपस्थितीत फॉर्म भरत होतो, तेव्हा सहकारी जिग्नेशने एक संविधानाची प्रत आणि मी गांधी-आंबेडकर आणि भगतसिंग यांचा फोटो त्यांना भेट दिला. कारण, या देशाला आज भगतसिंगांची साथ, आंबेडकरांची समानता आणि महात्मा गांधींच्या एकतेची आवश्यकता आहे.

मोठं जहाज वाचलं पाहिजे

कन्हैया म्हणाला, जो सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे, तो वाचवता आला नाही, तर देशही वाचणार नाही. जर मोठे जहाज वाचले नाही, तर लहान बोटीही वाचणार नाहीत. मी जिथे जन्मलो, ज्या पक्षात मोठा झालो, त्याने मला शिकवले, लढण्याची हिम्मत दिली. मी त्या पक्षा सोबतच, अशा लाखो आणि कोट्यवधी लोकांचेही आभार मानतो, जे कुठल्याही पक्षाचे नव्हते, पण कुण्या पक्षाकडून आमच्यावर अनावश्यक आरोप झाल्यानंतर, ते आमच्यासाठी व्हॉट्सअॅपवर लढत होते. या देशाला केवळ काँग्रेसच नेतृत्व देऊ शकते.

...म्हणून आज काँग्रेससोबत उभा आहे - जिग्नेश मेवाणी 

गुजरातमधून आमदार असलेले जिग्नेश मेवाणी म्हणाले, जी कहाणी गुजरातमधून सुरू झाली, तिने गेल्या 6-7 वर्षांत जे काही केले, ते आपल्या सर्वांच्या समोर आहे. आपल्या संविधानावर हल्ला आहे. आपल्या आइडिया ऑफ इंडियावर हल्ला आहे. लोकशाहीवर हल्ला आहे. आज भाऊ-भाऊ एकमेकांचे शत्रू होतील, असा द्वेश कारस्थान करून नागपूर आणि दिल्ली पसरवत आहे.  काहीही करून या देशाचे संविधान, लोकशाही आणि आयडिया ऑफ इंडियाला वाचवायचे आहे. यासाठी ज्यांनी इंग्रजांना देशातून हकलवून दाखवले, त्याच्या सोबत मला उभे राहायचे आहे. म्हणून मी आज काँग्रेससोबत उभा आहे. 

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमारcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीMahatma Gandhiमहात्मा गांधीDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर