शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

... म्हणून हेल्थ, टर्म इन्शुरन्स होऊ शकतात स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 09:23 IST

जीएसटी कमी करण्याची संसदीय समिती शिफारस

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : देशात विम्याचा विस्तार सध्या खूपच कमी आहे. देशातील एकूण ४ टक्के लोकांकडेच विम्याचे संरक्षण आहे. त्यात जीवन विमा ३ टक्के लोकांकडे, तर सामान्य विमा १ टक्का लोकांकडे आहे. विम्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्यावरील १८ टक्के जीएसटीमध्ये कपात करण्याची आवश्यकता असल्याचे संसदेच्या वित्तविषयक स्थायी समितीने म्हटले आहे. विम्यावर १८ टक्के जीएसटी असलेल्या जगातील मोजक्या देशांत भारताचा समावेश आहे. आता जीएसटी कमी झाल्यास टर्म व हेल्थ इन्श्युरन्स स्वस्त होण्याची शक्यता आहे.

प्राप्त आकडेवारीनुसार, २०२० मध्ये विमा व्यवसायाच्या दृष्टीने भारताचा जगात ११ वा क्रमांक होता. तो २०२१ मध्ये सुधारून १० वा झाला. २०२१ मध्ये भारताची बाजार हिस्सेदारी १.७८ टक्क्यांवरून वाढून १.८५ टक्के झाली. या वर्षात विमा हप्त्यातही १३.४६ टक्के वाढ झाली. 

विस्ताराला मर्यादाnमाजी केंद्रीय वित्त राज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखालील स्थायी समितीने म्हटले की, विमा उत्पादने विशेषत: आरोग्य व मुदती (टर्म) विमा यांवरील जीएसटी व्यवहार्य करण्याची गरज आहे.  जीएसटी अधिक असल्यामुळे भारतात विम्याचा हप्ता खूपच जास्त येतो. त्यामुळे विम्याच्या विस्तारास मर्यादा आल्या आहेत.nया क्षेत्राची भांडवली गरज पूर्ण करण्यासाठी सरकारने ‘ऑन-टॅप’ रोखे जारी करावेत, अशी शिफारस समितीने केली आहे. हे रोखे ४० हजार ते ५० हजार कोटी रुपयांचे असू शकतात, असेही म्हटले आहे. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स