शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

...म्हणून लडाखमधील दु:साहसाची चीनला मोजावी लागेल मोठी किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 08:18 IST

संरक्षण क्षेत्रातील जाणकारांचा इशारा; आंतरराष्ट्रीय राजकारणात चीन एकाकी पडण्याची शक्यता

नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये भारताविरुद्ध केलेल्या दु:साहसाची मोठी किंमत चीनला मोजावी लागेल. कारण या कृत्यामुळे चीन जागतिक पातळीवर एकटा पडणार आहे, असा इशारा आंतरराष्ट्रीय राजकारणातील जाणकारांनी दिला आहे. या कृत्यामुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी चीनला कित्येक दशके लागतील, असेही जाणकारांनी म्हटले आहे.

जाणकारांनी म्हटले आहे की, मागील दोन महिन्यांपासून चीनने पूर्व लडाख आणि दक्षिण चीन परिसरात केलेल्या दु:साहसाची मोठी आर्थिक किंमत चीनला मोजावी लागणार आहे. संपूर्ण जग कोरोना विषाणूशी लढत असताना चीनने या कारवाया केल्यामुळे चीनचा खरा चेहरा जगासमोर आला आहे.

चीनचे अमेरिकेसोबतचे करयुद्ध, ऑस्ट्रेलियासोबत वाढत चाललेल्या व्यापारी कुरबुरी आणि हाँगकाँगमध्ये बिघडत चाललेली स्थिती याचा उल्लेखही जाणकारांनी केला आहे. चीनने गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांवर जो निर्घृण हल्ला केला आहे, त्यातून हेच दिसून येते की, चीनची जनमुक्ती सेना केवळ एक राजकीय दल आहे. त्याच्याकडे कोणतेही लष्करी मानके नाहीत. माजी उपलष्करप्रमुख लेफ्टनंट जनल सब्रत साहा यांनी सांगितले की, आपल्या लष्करी आक्रमणामुळे चीन स्वत:च स्वत:ला एकटा पाडून घेत आहे. याची चीनला मोठी राजनैतिक आणि आर्थिक किंमत मोजावी लागेल. चीनच्या कारवाया आक्रमक आहेत. त्याची किंमत तर असेलच. चीन स्वत: एका कोपऱ्यात ढकलत आहे.चीनचा खरा चेहरा आला समोरमाजी लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल गुरमित सिंग यांनी सांगितले की, पूर्व लडाखमध्ये आक्रमक लष्करी वर्तणुकीचे प्रदर्शन करून चीनने फार मोठी चूक केली आहे. संपूर्ण जग कोरोनाशी लढत असताना या कारवाया करून चीनने आपला खरा चेहराच जगासमोर आणला आहे, याची चीनला मोजावी लागणारी किंमत प्रचंड मोठी असेल.इतरत्रच्या कारवायांबाबतही चिंतामाजी लेफ्टनंट जनरल सुब्रत साहा यांनी म्हटले की, या दु:साहसाची लक्षणीय अशी आर्थिक किंमतही चीनला मोजावी लागेल. येथे आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, जगात सध्या चीनच्या बाबतीत अनेक पातळ्यांवर चिंता व्यक्त होत आहे. हाँगकाँग, दक्षिण चीन समुद्र आणि पूर्व चीन समुद्र, अशा अनेक ठिकाणी जे काही घडत आहे, त्याबाबत जागतिक पातळीवर चिंता व्यक्त होत आहे. साहा यांनी चीन-अमेरिका वादाचाही उल्लेख केला. ‘फाईट टू फिनिश’ संघर्ष, असे त्याचे वर्णन केले. आॅस्ट्रेलियासोबत चीनच्या वाढत्या व्यापारी कुरबुरींचा मुद्दाही साहा यांनी उपस्थित केला.

टॅग्स :chinaचीनIndiaभारतAustraliaआॅस्ट्रेलिया