शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

म्हणून अल्पवयीन कुस्तीपटूच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात बृजभूषण सिंह यांना मिळाली क्लीन चिट, दिल्ली पोलिसांनी सांगितलं कारण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 16:45 IST

Brij bhushan sharan singh: अल्पवयीन महिला कुस्तीपटूच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांना दिल्ली पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे.

अल्पवयीन महिला कुस्तीपटूच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांना दिल्ली पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी पतियाळा कोर्टामध्ये ५५० पानांचा कॅन्सलेशन रिपोर्ट दाखल करून पॉक्सोअंतर्गत दाखल खटला हटवण्याची शिफारस केली आहे. 

दिल्ली पोलिसांनी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात ७ कुस्तीपटूंने केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपामध्ये दाखल केलेल्या दोन खटल्यांमध्ये गुरुवारी दोन कोर्टांमध्ये आरोपपत्र दाखल केलं. एक आरोपपत्र हे ६ महिला कुस्तीपटूंनी केलेल्या तक्रारीच्या खटल्यात रॉऊंज एव्हेन्यू कोर्टामध्ये दाखल करण्यात आलं आहे. तर दुसरं आरोपपत्र हे पतियाळा कोर्टामध्ये एका अल्पवयीन महिला कुस्तीपटूच्या तक्रारीवरून खटला दाखल करण्यात आला होता. आता या अल्पवयीन कुस्तीपटूने केलेल्या आरोपांच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी बृजभूषण सिंह यांना क्लीन चिट दिली आहे.

दिल्ली पोलिसांनी ५५० पानांच्या आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले की, पॉस्कोच्या तक्रारीबाबत कुठलाही पुरावा मिळालेला नाही. एवढंच नाही तर पॉस्कोचा तपास पूर्ण झाल्यानंतर तक्रारदार पीडितेचे वडील आणि स्वत: पीडितेने दिलेल्या जबाबांच्या आधारावर पोलिसांनी कॅन्सलेशन रिपोर्ट दाखल केला आहे.  तसेच पोलिसांनी कोर्टामध्ये बृजभूषण सिंहविरोधातील पॉस्कोअंतर्गत दाखल केस हटवण्याची शिफारस केली आहे.

७ महिला कुस्तीपटूंनी २१ एप्रिल रोजी दिल्ली पोलिसांकडे बृजभूषण सिंहविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी २८ एप्रिल रोजी बृजभूषण सिंहविरोधात दोन गुन्हे दाखल केले होते. पहिला गुन्हा सहा महिला कुस्तीपटूंच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आला होता. तर एक खटला हा अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून पॉस्को कायद्यानुसार दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, आपल्या जबाबामध्ये अल्पवयीन महिला कुस्तीपटूने बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. मात्र नंतर तिने आपला जबाब बदलला होता. तसेच कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर भेदभावाचा आरोप केला होता. तर दुसऱ्या जबाबामध्ये तिने लैंगिक शोषणाचा आरोप मागे घेताना आपली निवड न झाल्याने वैफल्यातून तक्रार केली होती, असा दावा केला.  

टॅग्स :brij bhushan sharan singhब्रिजभूषण शरण सिंहPoliceपोलिसWrestlingकुस्ती