शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

...म्हणून काश्मीरमध्ये ब्लॅक कॅट कमांडोंच्या तैनातीला लष्कराचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 12:52 IST

काश्मीर खो-यात ब्लॅक कॅट युनिट म्हणजे एनएसजी कमांडोंच्या तैनातील लष्कराने विरोध केला आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

ठळक मुद्देकाश्मीरमध्ये एनएसजी कमांडो तैनात करायला लष्कर आणि अन्य सुरक्षा पथकांचा विरोध आहे. सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या प्रशिक्षणापुरती एनएसजीची भूमिका मर्यादीत राहील.

श्रीनगर - काश्मीर खो-यात ब्लॅक कॅट युनिट म्हणजे एनएसजी कमांडोंच्या तैनातील लष्कराने विरोध केला आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे. काश्मीरमध्ये एनएसजी कमांडोंचा तळ उभारण्यात येणार असून, तिथे सुरक्षा पथकांना दहशतवाद्यांविरुद्ध कारवाईचे प्रशिक्षण देण्यात येईल. खासकरुन शहरी भागातील युद्धाचे प्रशिक्षण दिले जाईल. केंद्रीय गृहमंत्रालयाने काश्मीर खो-यात एनएसजीचा तळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. एनएसजीकडे प्रशिक्षणाची जबाबदारी असेल असे डीजीपी सुधीर प्रताप सिंह यांनी सांगितले. 

काश्मीरमध्ये एनएसजी कमांडो तैनात करायला लष्कर आणि अन्य सुरक्षा पथकांचा विरोध आहे. त्यामुळे सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या प्रशिक्षणापुरती एनएसजीची भूमिका मर्यादीत राहील अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडेने दिली आहे. सीआरपीएफच्या श्रीनगरजवळील लीथापोरा तळावर मागच्या महिन्याभरापासून एनएसजीचे 40 कमांडो तैनात आहेत. सीआरपीएफचा अजून कुठलाही प्रशिक्षण कार्यक्रम चालू झालेला नाही. 

अपहरण, दहशतवादविरोधी कारवाई करणारे एनएसजीचे 51 स्पेशल अॅक्शन ग्रुपचे कमांडो दक्षिण काश्मीरमध्ये तळ ठोकून आहेत. काश्मीर खो-यात सक्रीय असणा-या सुरक्षा पथकांमध्ये एनएनसजी कमांडोंच्या उपयुक्ततेबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत. दहशतवादविरुद्ध लढाईत एनएसजी सर्वोत्तम फोर्स समजली जाते. पण 26 ऑगस्टला पुलवामा येथे जिल्हा पोलीस लाईनवर जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा एनएसजीला बोलावण्यात आले नव्हते. 

त्यावेळी या दहशतवाद्यांशी झुंजणा-या एकही सुरक्षा पथकाला एनएसजी गरज भासली नाही. जिथे ही चकमक झाली त्या ठिकाणापासून काही किलोमीटर अंतरावर एनएसजी कमांडो तैनात होते.  काश्मीरमध्ये सैन्य सतत दहशतवाद्यांचा मुकाबला करत असते. पण एनएसजीला काही वर्षातून एकदा दहशतवाद्यांविरुद्ध लढाईला सामोरे जावे लागते असे एका अधिका-याने सांगितले. अनेक पथके काश्मीर खो-यात सक्रीय आहेत. एनएसजीच्या प्रवेशामुळे गोंधळ आणखी वाढेल असे सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिका-याने सांगितले. एनएसजीने मागच्यावर्षी मानेसर येथील मुख्यालयात काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपला ट्रेन केले होते.