सियाचिनमध्ये हिमकडा कोसळला, १० जवान अडकल्याची भीती
By Admin | Updated: February 3, 2016 16:45 IST2016-02-03T16:44:10+5:302016-02-03T16:45:30+5:30
जम्मू-काश्मीरमधील सियाचिन ग्लैशियरमध्ये हिमकडा कोसऴून झालेल्या दुर्घटनेत १० जवान अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

सियाचिनमध्ये हिमकडा कोसळला, १० जवान अडकल्याची भीती
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. - जम्मू-काश्मीरमधील सियाचिन ग्लैशियरमध्ये हिमकडा कोसऴून झालेल्या दुर्घटनेत १० जवान अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
सियाचिनच्या उत्तर ग्लैशियरमध्ये एका अधिका-यांसह १० जवान पेट्रोलिंग करत असताना हिमकडा कोसऴला. या दुर्घटनेत सर्वजण अ़डकले असल्याची भीती कर्नल एस डी गोस्वामी यांनी व्यक्त केली असून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.