हिमवृष्टीने केदारनाथ यात्रा पुन्हा स्थगित

By Admin | Updated: May 13, 2014 04:52 IST2014-05-13T04:52:11+5:302014-05-13T04:52:11+5:30

हिमालयातील मंदिरात बर्फवृष्टी आणि केदार खोर्‍यातील सखल भागात पाऊस पडत असल्याने केदारनाथ यात्रा सोमवारी सलग दुसर्‍या दिवशी थांबविण्यात आली

Snowfall again postponed Kedarnath Yatra | हिमवृष्टीने केदारनाथ यात्रा पुन्हा स्थगित

हिमवृष्टीने केदारनाथ यात्रा पुन्हा स्थगित

देहराडून : हिमालयातील मंदिरात बर्फवृष्टी आणि केदार खोर्‍यातील सखल भागात पाऊस पडत असल्याने केदारनाथ यात्रा सोमवारी सलग दुसर्‍या दिवशी थांबविण्यात आली. हवामानामध्ये सुधारणा होईस्तोवर सुरक्षेच्या कारणाने यात्रा तात्पुरती थांबवण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री हरीश रावत म्हणाले. हवामान सुस्थितीत येताच सोनप्रयाग शिबिरातील भाविकांना दर्शनासाठी जाऊ दिले जाईल, असेही ते म्हणाले. आज दुसर्‍या दिवशी मंदिराच्या परिसरात हिमवृष्टी होत होती, तर सखल भागात पाऊस सुरू होता. खराब हवामानामुळे भाविकांना सोनप्रयाग शिबीर सोडण्याची परवानगी देण्यात आली नाही, असे केदारनाथचे एसडीएम उत्तमसिंग चौहान म्हणाले. केदारनाथपासून ४ कि.मी. अंतरावर असलेल्या लिचौली येथे सुमारे २४ भाविक थांबले होते. हिमवृष्टी आणि पाऊस सुरू झाल्याने त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. सहा महिन्यांनंतर केदारनाथ मंदिर ४ मे रोजी पुन्हा भाविकांसाठी खुले करण्यात आले होते. (वृत्तसंस्था)

Web Title: Snowfall again postponed Kedarnath Yatra