अरुणाचलमध्ये हिमवृष्टी
By Admin | Updated: February 4, 2015 03:19 IST2015-02-04T03:19:18+5:302015-02-04T03:19:18+5:30
पारा शून्याखाली घसरल्याने अरुणाचल प्रदेशातील अनेक जिल्हे या हिवाळ्यातील पहिली हिमवृष्टी अनुभवत आहेत़ पर्यटकांसाठी ही मोठी पर्वणी ठरली़

अरुणाचलमध्ये हिमवृष्टी
नवी दिल्ली : पारा शून्याखाली घसरल्याने अरुणाचल प्रदेशातील अनेक जिल्हे या हिवाळ्यातील पहिली हिमवृष्टी अनुभवत आहेत़ पर्यटकांसाठी ही मोठी पर्वणी ठरली़ तिकडे काश्मीर खोऱ्यात मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशीही हिमवृष्टी सुरू आहे़ हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या अनेक भागांतही काल सोमवारी रात्रीपासून हिमवृष्टी सुरू आहे़ उत्तराखंडात २५०० मीटरपेक्षा उंच क्षेत्रात हिमवृष्टीसोबत हिमस्खलनाचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे़