स्नूपगेट : सरकारची ‘घेरा’बंदी करणार
By Admin | Updated: March 15, 2015 23:11 IST2015-03-15T23:11:09+5:302015-03-15T23:11:09+5:30
राहुल गांधी यांच्या हेरगिरीचा मुद्दा तापला आहे. गुजरातच्या धर्तीवर विरोधी पक्षनेत्यांचीही हेरगिरी होत असून, हा मुद्दा संसदेत लावून धरणार असल्याचे काँग्रेसने रविवारी स्पष्ट केले.

स्नूपगेट : सरकारची ‘घेरा’बंदी करणार
नवी दिल्ली : राहुल गांधी यांच्या हेरगिरीचा मुद्दा तापला आहे. गुजरातच्या धर्तीवर विरोधी पक्षनेत्यांचीही हेरगिरी होत असून, हा मुद्दा संसदेत लावून धरणार असल्याचे काँग्रेसने रविवारी स्पष्ट केले.
नागरिकांच्या खासगीपणाचा अधिकार पाहता सरकारला या प्रश्नाचे उत्तर द्यावेच लागेल. एका राज्यात जे घडले ते अन्यत्रही घडविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा म्हणाले.
पोलिसांनी राहुल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या ठावठिकाण्याबाबत चौकशी केल्यानंतर काँग्रेसने जोरदार निषेध नोंदविला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)