एसएनडीएलच्या कंत्राटदारांचा संप मागे
By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:16+5:302015-01-23T23:06:16+5:30

एसएनडीएलच्या कंत्राटदारांचा संप मागे
>ग्राहकांना दिलासा : मागण्यावर तोडगा निघालानागपूर : वीज वितरण फ्रेन्चाईजी-एसएनडीएल व त्यांचे कंत्राटदार यांच्यात समेट झाल्याने गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेला संप शुक्र वारी सायंकाळी कंत्राटदारांनी मागे घेतला.थकबाकी देण्याचे आश्वासन मिळाल्याने कंत्राटदारांची संघटना व्हेन्डर असोसिएशनने संप मागे घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता कंत्राटदारांंनी काम सुरू केले. ग्राहकांचे हित विचारात घेता हा निर्णय घेतल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.थकबाकी देत नसल्याचा आरोप करीत कंत्राटदारांनी संप पुकारला होता. चर्चेतून तोडगा न निघाल्याने कंत्राटदारांनी दुसऱ्या दिवशीही कार्यालये बंद ठेवली होती. शुक्रवारी सकाळी एसएनडीएल व संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली. यात मागण्यावर तोडगा निघाला.बैठकीत कंपनीतर्फे एक्सेल समूहाचे वित्त प्रमुख हिमांशू शाह , व्यापार प्रमुख सोनल खुराणा, महाप्रबंधक मुकेश धिंगरा तर कंत्राटदारांतर्फे नरेंद्र जिचकार, जावेद अख्तर, सुनील वत्स, रामू कनौजिया, महेंद्र जिचकार, रोशन ठाकूर व अजय त्रिपाठी आदींचा समावेश होता. ३० जानेवारीपर्यत थकबाकी न मिळाल्यास पुन्हा संप पुकारण्याचा इशारा कंत्राटदारांनी दिला आहे.(प्रतिनिधी)चौकट....असा झाला समेटचर्चेत ठरल्यानुसार स्पॅन्कोच्या काळातील थकबाकी २४ तारखेपर्यंत तर त्यानंतरची थकबाकी ३० जानेवारीपर्यत देण्यात यावी तसेच हकनाक कपात करण्यात आलेली दंडाची रक्कम परत करण्यात यावी. भविष्यात असा प्रकार घडणार नसल्याचे आश्वासन कंपनीकडून देण्यात आले आहे.