शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Smriti Irani Daughter Engagement : स्मृती इराणींच्या कन्येने केला साखरपुडा, पाहा कोण आहे त्यांचा होणारा जावई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 13:57 IST

Smriti Irani Daughter Engagement : स्मृती इराणी यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांची कन्या शेनेल हिचा बॉयफ्रेंड Arjun Bhalla गुडघ्यावर बसून तिला साखरपुड्याची अंगठी घालताना दिसत आहेत. त्याशिवाय अन्य एका फोटोमध्ये शेनेल आणि अर्जुन रोमँटिक पोझमध्ये दिसत आहे.

नवी दिल्ली - केंद्र सरकारमधील मंत्री आणि भाजपाच्या आघाडीच्या महिला नेत्या स्मृती इराणी ह्या त्यांच्या राजकीय कामाबरोबरच वैयक्तिक जीवनामुळेही चर्चेत असतात. स्मृती इराणी ह्यांनी झुबिन इराणी यांच्याशी विवाह केला असून. त्यांना दोन मुले आहेत. मुलाचे नाव जोर इराणी तर मुलीचे नाव हे जोईल इराणी आहे. दरम्यान, स्मती इराणींच्या पतीला पहिल्या पत्नीपासूनही एक मुलगी आहे तिचे नाव शेनेल आहे. आता स्मृती इराणी ह्यांनी त्यांच्या मुलीबाबत आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. स्मृती इराणी यांनी त्यांची कन्या शेनेल हिचा साखरपुडा झाल्याची माहिती इन्स्टाग्रामवरून दिली आहे. तसेच स्मृती इराणी यांनी त्यांची कन्या आणि जावयाचा फोटो शेअर केला आहे.

स्मृती इराणी यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांची कन्या शेनेल हिचा बॉयफ्रेंड अर्जुन भल्ला गुडघ्यावर बसून तिला साखरपुड्याची अंगठी घालताना दिसत आहेत. त्याशिवाय अन्य एका फोटोमध्ये शेनेल आणि अर्जुन रोमँटिक पोझमध्ये दिसत आहे.स्मृती इराणी यांनी जोडप्याचा फोटो शेअर करताना लिहिले की, ही पोस्ट त्या व्यक्तीसाठी ज्याने आम्हा सर्वांचे मन जिंकले आहे. आमच्या कुटुंबात तुमचं स्वागत आहे. तुम्हाला सासरे म्हणून एका अवलिया व्यक्तीचा सामना करावा लागणार आहे. ही माझी तुम्हाला अधिकृत सूचना आहे. गॉड ब्लेस...

स्मृती इराणी यांनी हा फोटो शेअर केल्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी रांग लागली आहे. अभिनेत्री मौनी रॉय, एकता कपूर, दिव्या शेठ साह यांसारख्या सेलेब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहे. स्मृती इराणी ह्या २०१४ पासून केंद्रीय मंत्री म्हणून काम करत आहेत. त्यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींचा पराभव केला होता. सध्या मोदी सरकारमध्ये त्या महिला आणि बालकल्याणमंत्री आहेत.  

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीFamilyपरिवार