शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

माझ्या मुलीच्या चारित्र्यावर प्रहार, आरोपानंतर स्मृती इराणी चांगल्या भडकल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 09:01 IST

स्मृती इराणींच्या मुलीचा गोव्यात बेकायदेशीर बार; काँग्रेसचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीचा गोव्यात बेकायदेशीर बार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशी मागणी काँग्रेसचे मीडिया व प्रचारप्रमुख पवन खेडा यांनी केला.  

स्मृती यांच्या मुलीच्यावतीने हे आरोप फेटाळण्यात आले. त्यांचे वकील कीरत नागरा म्हणाले की, त्या सिली सोल्स नावाच्या रेस्टॉरंटच्या ना मालक आहेत, ना त्याचे संचालन करतात. स्मृती यांनी हे आरोप फेटाळून लावत स्पष्ट केले की, ही लढाई आपण न्यायालयात न्यायालयात लढू. काँग्रेसने म्हटले की, उत्पादन शुल्क विभागाने इराणी यांच्या मुलीला कारणे दाखवा नोटीस दिली होती.  नोटीस  देणाऱ्या अधिकाऱ्याची कथितरित्या बदली करण्यात येत आहे. ही माहिती आरटीआयमधून मिळाली. इराणींच्या मुलीने सिली बनावट दस्तऐवज देऊन बार लायसन्स मिळविले, असा आरोप खेडा यांनी केला. 

माझ्या मुलीच्या चारित्र्यावर प्रहार नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात ५००० कोटींच्या लुटीबाबत आपण आवाज उठविल्याने माझ्या मुलीला लक्ष्य केले आहे. काँग्रेसने माझ्या मुलीच्या चारित्र्यावर प्रहार केला आहे. माझी १८ वर्षीय मुलगी कॉलेजमध्ये प्रथम वर्षात शिकत आहे आणि कोणताही बार चालवित नाही. तिची चूक एवढीच आहे की, तिच्या आईने २०१४ व २०१९ ची लोकसभा निवडणूक काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात लढविली.     - स्मृती इराणी, केंद्रीय मंत्री

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीBJPभाजपाcongressकाँग्रेसgoaगोवा