शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Smriti Irani : "हे दिव्य राजकीय प्राणी..."; काँग्रेसच्या 'Missing' ट्विटला स्मृती इराणींचं जोरदार प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 11:46 IST

Smriti Irani And Congress : काँग्रेसने ट्विटरवर स्मृती इराणी यांचे पोस्टर शेअर केले असून त्यावर Missing असं लिहिलं आहे. 

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटूंनी महिनाभर केलेल्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने बुधवारी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांना लक्ष्य केलं. काँग्रेसने ट्विटरवर स्मृती इराणी यांचे पोस्टर शेअर केले असून त्यावर Missing असं लिहिलं आहे. 

ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करत कुस्तीपटू त्यांच्या अटकेची मागणी करत आहेत. मात्र आतापर्यंत महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी या संपूर्ण घटनेवर मौन बाळगलं आहे. काँग्रेस पक्षाने स्मृती इराणी बेपत्ता असल्याचं वर्णन करणारे सलग दोन ट्विट केले आहेत. यामध्ये त्यांनी स्मृती यांच्यावर निशाणा साधला आहे. 

स्मृती महिला कुस्तीपटूंच्या प्रश्नांवर केलेले ट्विट लपवतात, असं काँग्रेसने एका ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच त्यांच्यासोबत भाजपा मंत्री मीनाक्षी लेखी यांचाही एक फोटो आहे, ज्या महिला कुस्तीपटूंच्या प्रश्नांपासून दूर पळत असल्याचं ट्विटमध्ये म्हटलं आहे. काँग्रेसच्या या Missing ट्विटला स्मृती इराणी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 

"हे दिव्य राजकीय प्राणी, मी सध्या अमेठी लोकसभा मतदारसंघातल्या सलोन विधानसभा मतदारसंघातील सिरसिरा गावाहून धुरनपूरच्या दिशेने निघाले आहे. जर तुम्ही माजी खासदारांना शोधत असाल, तर कृपया अमेरिकेत संपर्क करा" असं म्हणत स्मृती इराणी यांनी हल्लाबोल केला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी काँग्रेसलाही प्रत्युत्तर दिलं आहे. यासोबतच राहुल गांधींच्या अमेरिका दौऱ्यावरही टीका केली आहे. 

 

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस