शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

स्मृती इराणींवर पंतप्रधान मोदी नाराज; अंधारात ठेवून घेतला होता 'फेक न्यूज'बद्दलचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 13:28 IST

वादग्रस्त निर्णयामुळे पंतप्रधान मोदींनी स्मृती इराणींना झापलं

केंद्र सरकारने फेक न्यूजबद्दलचा आदेश अवघ्या 24 तासांमध्ये मागे घेतला. पंतप्रधान मोदींनी हा आदेश मागे घेतल्याने माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्यावर मोठी नामुष्की ओढवली. या संपूर्ण प्रकरणात मोदींना अंधारात ठेवण्यात आल्याने ते अतिशय नाराज झाल्याची माहिती आता समोर आली आहे. सरकारला या प्रकरणात यू टर्न घ्यावा लागल्याने मोदींनी स्मृती इराणी यांची  चांगलीच कानउघाडणी केली आहे. फेक न्यूज प्रकरणात पत्रकाराची मान्यता रद्द करण्याचा आदेश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने प्रसिद्ध केला होता. मात्र यामुळे मोदी सरकारला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. सोमवारी जारी करण्यात आलेला हा आदेश पंतप्रधान कार्यालयाने अवघ्या 24 तासांमध्ये मागे घेतला. मनुष्यबळ विकास मंत्री असताना स्मृती इराणी अनेकदा वादात सापडल्या होत्या. मात्र माहिती आणि प्रसारण खात्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच स्मृती इराणी वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. स्मृती इराणी यांच्या माहिती आणि प्रसारण खात्याने फेक न्यूज प्रकरणात काढलेल्या आदेशावर पंतप्रधान मोदी अतिशय नाराज होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणात स्मृती इराणींना स्पष्ट संदेश देण्याचा मोदींचा मानस होता. त्यामुळेच इराणी यांच्या खात्याने काढलेला आदेश पंतप्रधान कार्यालयाने अवघ्या 24 तासांमध्ये मागे घेतला. स्मृती इराणींनी घेतलेल्या या निर्णयाची तुलना राजीव गांधी सरकारने 1980 मध्ये घेतलेल्या मानहानी कायद्याशी केली जात होती. त्यातच इराणींनी इतका मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेताना मोदींना अंधारात ठेवले होते. त्यामुळे मोदी अतिशय नाराज होते. 'पंतप्रधान मोदींनी फेक न्यूज संदर्भातील आदेश मागे घेण्याची सूचना केली होती. याबद्दलचा निर्णय प्रेस काऊंसिल ऑफ इंडियाकडे सोपवण्यात यावा, असे मोदींनी सांगितले होते,' असे पंतप्रधान कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणात सरकारचा कोणताही हस्तक्षेप नसावा, अशी भूमिका मोदींनी मांडल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSmriti Iraniस्मृती इराणीFake Newsफेक न्यूजBJPभाजपा