शहरं
Join us  
Trending Stories
1
विवेकानंद रॉक मेमोरियल इथं ध्यान अवस्थेत बसले PM मोदी; 'असे' असतील पुढचे ४५ तास 
2
Explainer: छगन भुजबळांच्या मनात चाललंय काय?; 'या' ४ घटनांमुळे निर्माण झालं संशयाचं वातावरण
3
आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; विधानपरिषदेच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा सुटणार?
4
Time Magazine च्या 100 प्रभावशाली कंपन्यांच्या यादीत रिलायन्स, टाटा आणि सीरमचा समावेश
5
गत आर्थिक वर्षांत ६३ बँकांमध्ये १४,५९६ कोटींचे घोटाळे, केवळ ७५४ कोटी वसूल
6
'इंडिया'ची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार? काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी दिलं असं उत्तर  
7
धक्कादायक! गटारात स्त्री जातीचं अर्भक सापडलं; साताऱ्यातील घटनेनं खळबळ 
8
२०० पेक्षा अधिक रॅली, रोड शो, सभा, ८० मुलाखती..; देशात PM नरेंद्र मोदींचा तगडा प्रचार
9
"महाराष्ट्रासह या 4 राज्यात काँग्रेस जोरदार मुसंडी मारणार", जयराम रमेश यांचा दावा
10
ब्लॉक सुरु होण्यापूर्वीच लोकलला १५ ते ३० मिनिटांचा लेटमार्क; आज १६१ लोकल फेऱ्या रद्द
11
मृणाल दुसानीसच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री लवकरच करणार कलाविश्वात कमबॅक; म्हणाली...
12
रिलायन्सचे पेटीएम, फोनपेला मोठं आव्हान! JioFinance ॲप लाँच; युजर्सना मिळणार 'हे' फायदे
13
"मी भारताकडून खेळणार म्हणजे खेळणारच, बाकी मला...", रियान परागचं विधान
14
६ महिन्यांचे काम अडीच दिवसांत! मध्य रेल्वेच्या 'स्पेशल ब्लॉक'नंतर प्रवाशांना 'स्पेशल' ट्रिटमेंट
15
" ‘इंडिया’चा विजय झाल्यास ४८ तासांत होणार नव्या पंतप्रधानांची घोषणा, असा असेल निवडीचा फॉर्म्युला’’, जयराम रमेश यांचा दावा
16
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू
17
Fact Check : सट्टा बाजाराच्या नावाने व्हायरल होणारी 'लोकसभेची भविष्यवाणी' FAKE; जाणून घ्या सत्य
18
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
19
सलमान, अजय अन् अक्षयनेही नाकारलेला सिनेमा पडला पदरात! अभिनेत्याचं उजळलं नशीब
20
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल

Video : "स्वयंपाकाचा गॅस महाग का?"; विमानात Smriti Irani यांच्यासोबत काँग्रेस नेत्याची शाब्दिक चकमक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 10:25 PM

Smriti Irani : युपीए सरकारदरम्यान स्वयंपाकाचा गॅस महाग झाल्यानंतर स्मृती इराणी यांनी विरोधकांवर निशाणा साधला होता. आता काँग्रेसच्या नेत्यानं त्यांना प्रश्न विचारले आहेत.

Smriti Irani Gas Cylinder Price : गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल-डिझेल असेल किंवा स्वयंपाकाचा गॅस यांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. महागाईविरोधात काँग्रेसनं केंद्र सरकारवर हल्लाबोल सुरू केला आहे. याचदरम्यान, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नेटा डिसुझा (Netta Dsouza) यांनी महागाईबाबत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Minister Smriti Irani) यांच्या विमानातच प्रश्न विचारण्यास सुरूवात केली.

ही घटना दिल्ली-गुवाहाटी विमानाच्या प्रवासादरम्यान घडली. जेव्हा विमानात नेटा डिसुझा आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आमने-सामने आल्या तेव्हा त्यांनी स्मृती इराणींना स्वयंपाकाच्या गॅसबद्दल प्रश्न विचारला. त्यांनी याचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यांनी जवळपास १ मिनिट ११ सेकंदाचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये स्मृती इराणी नेटा डिसुझा यांच्या प्रश्नाचं कोणतंही थेट उत्तर देताना दिसत नाहीयेत. यादरम्यान, स्मृती इराणी यांनी लोकांना पहिले विमानातून उतरू द्या त्यांना समस्या होत आहे असं सांगितलं. यावर उत्तर देताना डिसुझा यांनी हा लोकांचाच प्रश्न असल्याचं म्हटलं.

विमानात शाब्दिक चकमकप्रवासादरम्यान एका महिला प्रवाशानं स्मृती इराणी यांना 'हॅप्पी बिहू' असं विश केलं. यावर त्यांनीही उत्तर दिलं. यावर डिसुझा यांनी "हॅप्पी बिहू, विना स्टो, विना गॅस" असं म्हटलं. यावर उत्तर देताना स्मृती इराणी यांनी तुम्ही खोटं बोलू नका, तुम्ही चुकीचं बोलताय असं म्हटलं. दरम्यान, आपल्या परवानगीशिवाय तुम्ही रेकॉर्डिंग करत आहात, असं इराणी म्हणाल्या. यावर उत्तर देताना "तुम्ही महत्त्वाच्या पदावर आहात, लोकांना तुमच्याकडून उत्तर हवं आहे." असं डिसुझा म्हणाल्या. यावर पुन्हा इराणी यांनी उत्तर देत "कोरोना संकटादरम्यान लोकांना मोफत लस देण्यात आली," असंही म्हटलं. दोघांमधील संभाषणाचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीCylinderगॅस सिलेंडरcongressकाँग्रेसBJPभाजपा