500 रुपयांत स्मार्टफोन

By Admin | Updated: February 16, 2016 16:13 IST2016-02-16T16:13:07+5:302016-02-16T16:13:07+5:30

आता फक्त 500 रुपयांत स्मार्टफोन विकत घेऊ शकता. 'रिंगिंग बेल्स' कंपनी हा स्मार्टफोन लवकरच बाजारात आणणार आहे

Smartphone at Rs 500 | 500 रुपयांत स्मार्टफोन

500 रुपयांत स्मार्टफोन

 

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - स्मार्टफोन विकत घेत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे, आता फक्त 500 रुपयांत स्मार्टफोन विकत घेऊ शकता. 'रिंगिंग बेल्स' कंपनी हा स्मार्टफोन लवकरच बाजारात आणणार आहे. 
केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते 17 फेब्रुवारीला हा स्मार्टफोन लाँच करण्यात येणार आहे. या स्मार्टफोनला 'फ्रीडम 251' असं नाव देण्यात आलं आहे. या स्मार्टफोनमधील फिचरसंबंधी कंपनीने अजून माहिती दिलेली नाही आहे.
सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या स्मार्टफोनच्या किंमती दीड हजारापासून सुरु होतात. हा स्मार्टफोन बाजारात आल्याने महागडे फोन खरेदी न करु शकणा-या ग्राहकांना स्मार्टफोनचा अनुभव घेता येणार आहे. 
गेल्यावर्षी डेटाविंड या कंपनीने अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशनसोबत हात मिळवणी करुन स्वस्त स्मार्टफोन बाजारात आणण्याची घोषणा केली होती. मात्र अद्याप त्यांनी लाँचिंग केलेलं नाही आहे. त्यामुळे रिंगिंग बेल्सचा हा स्मार्टफोन सर्वात स्वस्त फोन ठरणार आहे.

Web Title: Smartphone at Rs 500