स्मार्ट सिटी, ‘अमृत’च्या कामाचा लवकरच प्रारंभ

By Admin | Updated: June 7, 2015 23:02 IST2015-06-07T23:02:34+5:302015-06-07T23:02:34+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ जून रोजी ९८ हजार कोटी रुपयांच्या स्मार्ट सिटी आणि ‘अमृत’ प्रकल्पांचा औपचारिक प्रारंभ करणार आहेत.

Smart City, 'Amrit' work start soon | स्मार्ट सिटी, ‘अमृत’च्या कामाचा लवकरच प्रारंभ

स्मार्ट सिटी, ‘अमृत’च्या कामाचा लवकरच प्रारंभ

नवी दिल्ली : लोकसंख्येच्या वाढत्या बोजामुळे नियोजनावर येत असलेला ताण पाहता शहरी पायाभूत संरचनेचा कायाकल्प करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ जून रोजी ९८ हजार कोटी रुपयांच्या स्मार्ट सिटी आणि ‘अमृत’ प्रकल्पांचा औपचारिक प्रारंभ करणार आहेत.
विज्ञान भवनात होणाऱ्या कार्यक्रमात मोदी शहरी नवीनीकरणाच्या या दोन मोठ्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीबाबत घोषणा करतील. राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांतील वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
अमृत या प्रकल्पाचे पूर्ण नाव ‘अटल मिशन फॉर रिजूव्हेनेशन अ‍ॅण्ड अर्बन ट्रान्स्फॉर्मेशन’ (एएमआरयूटी-अमृत) असे आहे. २५ जून हा दिवस शहरी विकासाच्या क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण दिवस असेल. केंद्र, अन्य स्रोतांच्या माध्यमातून होणाऱ्या गुंतवणुकीचा प्रभावीरीत्या उपयोग करीत कार्य पुढे सुरू नेण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारे आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांवर येणार
आहे, असे नगरविकासमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी म्हटले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 

Web Title: Smart City, 'Amrit' work start soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.