एस.एम.कृष्णा लवकरच करणार भाजपात प्रवेश - येडियुरप्पा
By Admin | Updated: February 4, 2017 13:13 IST2017-02-04T11:53:50+5:302017-02-04T13:13:43+5:30
नुकताच काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले एस.एम.कृष्णा लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत.

एस.एम.कृष्णा लवकरच करणार भाजपात प्रवेश - येडियुरप्पा
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ४ - गांधी घराण्याचे निष्ठावंत मानले जाणारे, माजी केंद्रीय मंत्री यांनी नुकताच काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तेच एस.एम.कृष्णा आता लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे समजते. ' कृष्णा यांनी भाजपामध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र ते पक्षात कधी प्रवेश करतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही' अशी माहिती कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष बी.एस. येडियुरप्पा यांनी दिली.
काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांचा योग्य मान राखला जात नसल्याची टीका करत कृष्णा यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षाला रामराम केला होता. 'पक्षात निष्ठावान कार्यकर्त्यांची अवहेलना होते, ते पाहून मला खूप दु:ख होतं. माझ वय जास्त असल्याने मला डावललं जात, मात्र पक्षकार्यासाठी वय हा निकष असू शकत नाही' अशी टीकाही त्यांनी केली होती.