कोलकात्यात डम डम पार्क परिसरातील झोपडपट्टीला आग
By Admin | Updated: December 26, 2015 21:28 IST2015-12-26T21:20:33+5:302015-12-26T21:28:31+5:30
उत्तरेकडील डम डम पार्क परिसरात असलेल्या एका झोपडपट्टीला शनिवारी सांयकाऴच्या सुमारास आग लागली.

कोलकात्यात डम डम पार्क परिसरातील झोपडपट्टीला आग
>ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. २६ - उत्तरेकडील डम डम पार्क परिसरात असलेल्या एका झोपडपट्टीला शनिवारी सांयकाऴच्या सुमारास आग लागली.
ही आग मोठी असून आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या १२ गाड्या दाखल झाल्या असून आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
आगीचे कारण अद्याप समजले नसून आग लागल्याने जवऴजवळ आठ सिलेंडर गॅसचे स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तसेच, अद्याप या आगीमुळे कोणतीही जीवितहाणी झाल्याचे वृत्त नाही.