शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

भीषण अपघात! कर्नाटकातील चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 08:50 IST

अपघातग्रस्त बस बेंगळुरूहून गोकर्णला जात होती, अशी माहिती मिळाली आहे. एसपी रणजीत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. ही घटना हिरीयुर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

चिकोडी :  कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी पहाटे एक मोठा रस्ता अपघात घडला. एका खाजगी स्लीपर बसची ट्रक (लॉरी) शी टक्कर झाली. धडक इतकी भीषण होती की स्लीपर बसने पेट घेतला. या अपघातात किमान १७ जणांचा मृत्यू झाला.

माहितीनुसार, बस बंगळुरूहून शिवमोगाला जात होती. स्लीपर बसला ३०० किलोमीटरहून अधिक प्रवास करावा लागला. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग ४८ (एनएच-४८) वर झाला. या अपघातात २५ हून अधिक जण गंभीर जखमी झाले.

विरुद्ध दिशेने येणारा कंटेनर दुभाजक उडवून  बसला धडक दिली. यामुळे डिझेल टाकीचा स्फोट झाला. मोठी आग लागली. बस बंगळुरहून गोकर्णकडे जात होती तर कंटेनर हिरियुरहून बंगळुरूला जात होता.  सदर बस सी बर्ड कोच टुरिस्ट बस असून बस मध्ये १४ महिला व १५ पुरुष प्रवास करीत होते. 

तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू

अपघातानंतर बस चालक, कंडक्टर आणि प्रवाशांनी बसमधून उड्या मारल्या  यामुळे ते वाचले. लॉरी चालक कुलदीप याचा मृत्यू झाल्याचे समजते. अपघातानंतर, राष्ट्रीय महामार्ग ४८ वर सुमारे ३० किमी वाहतूक कोंडी झाली होती. शिरा पर्यंत हजारो वाहने अनेक किलोमीटरपर्यंत उभी होती.

अपघातग्रस्त बस बेंगळुरूहून गोकर्णला जात होती, अशी माहिती मिळाली आहे. एसपी रणजीत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. ही घटना हिरीयुर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

बसमध्ये चालक आणि वाहक असे एकूण ३१ जण प्रवास करत होते. २५ जण गोकर्णाचे, दोन कुमटा आणि दोन शिवमोगा येथील असल्याचे कळते.

 बुकिंगच्या तपशीलांनुसार, मंजुनाथ, संध्या, शशांक, दिलीप, प्रीतीश्वरन, व्ही. बिंदू, के. कविता, अनिरुद्ध बॅनर्जी, अमृता, ईशा, सूरज, मनसा, मिलना, हेमराज कुमार, कल्पना प्रजापती, एम. शशिकांत, विजय भंडारी, नव्या, अभिषेक, एच. किरण पाल, एम. कीर्तन हे प्रवासी होते. मृत आणि जखमींची माहिती अजून मिळालेली नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Sleeper bus fire after truck collision in Chitradurga, 17 dead.

Web Summary : Near Hiriyur, Karnataka, a bus collided with a container, causing a fire and killing at least 17. Over 25 were injured. The bus, en route from Bangalore to Gokarna, had 31 passengers. Injured are hospitalized; investigation underway.
टॅग्स :Accidentअपघात