शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

'स्लीप ऑफ टंग'... राहुल गांधी मसूद अझहरला म्हणाले 'मसूद अझहरजी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 19:40 IST

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज भाजपाला लक्ष्य केले. मात्र...

नवी दिल्ली -  पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज भाजपाला लक्ष्य केले. मात्र भाजपावर टीका करण्याच्या भारात राहुल गांधींनी कुख्यात दहशतवादी आणि पुलवामा हल्ल्याचा मास्टर माइंड मसूद अझहर याचा उल्लेख मसूद अझहरजी असा केला. त्यामुळे भाजपाला घेरण्याच्या नादात राहुल गांधी स्वत:च अडचणीत सापडल्याची चर्चा सुरू झाली आहे. राहुल गांधी यांनी आज दिल्लीमध्ये काँग्रेसच्या बुथ कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यावेळी पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. तसेच भाजपाच्या याआधीच्या सरकारनेच मसूद अझहरला सोडल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला. मात्र यादरम्यान भाजपावर टीका करण्याचा भारात राहुल गांधी यांनी मसूद अजहर याचा उल्लेख मसूद अझहरजी असा केला. 

 दरम्यान, राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावरून भाजपाने त्यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. भाजपाने यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे. देशाच्या वीर जवानांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्यासाठी राहुल गांधी यांच्या मनात एवढा सन्मान? असा प्रश्न भाजपाने विचारला आहे.  

मात्र कार्यकर्त्यांना संबोधित करताना पुलवामा येथील दहशतवादी हल्ला, तसेच डोकलाम प्रश्नी मोदी सरकारने घेतलेली भूमिका यावरूनही राहुल गांधी यांनी भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९masood azharमसूद अजहर