रामनवमी, महावीर जयंतीला कत्तलखाने बंद
By Admin | Updated: March 24, 2015 23:32 IST2015-03-24T23:07:16+5:302015-03-24T23:32:28+5:30
नाशिक : येत्या शनिवारी (दि.२८) आणि गुरुवार, दि. २ एप्रिलला महावीर जयंती असल्याने या दिवशी महापालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागाने काढले आहेत.

रामनवमी, महावीर जयंतीला कत्तलखाने बंद
नाशिक : येत्या शनिवारी (दि.२८) आणि गुरुवार, दि. २ एप्रिलला महावीर जयंती असल्याने या दिवशी महापालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागाने काढले आहेत.
श्रीरामनवमी आणि महावीर जयंती या दिवशी महापालिका हद्दीत कुणीही जनावरांची कत्तल, तसेच मांसविक्री करू नये. कत्तल अथवा मांसविक्री करताना आढळून आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागाने दिला आहे.