शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

Madhya Pradesh: भाजपा कार्यकर्त्याच्या कानशिलात मारलेली; महिला जिल्हाधिकाऱ्यावर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 12:42 IST

राजगढ जिल्ह्यातील ब्यावरामध्ये १९ जानेवारीला नागरिकता संशोधन कायदा सीएएच्या समर्थनासाठी रॅली काढण्यात आली होती.

भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये सपा, बसपाच्या आमदारांच्या मदतीने सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपाचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पदभार स्वीकारताच काही महत्वाचे निर्णय घेतले. त्यांनी महानगरपालिका आयोगाची सर्व राजकीय नामनिर्देशने रद्द केली आहेत. याचबरोबर चौहान यांनी भाजपा नेत्याच्या कानशिलात मारणाऱ्या राजगढच्या जिल्हाधिकारी निधि निवेदिता आणि एसडीएम प्रिया वर्मा यांची बदली केली आहे. याशिवाय रीवा नगर पालिकेचे आयुक्त सभाजीत यादव यांनाही हटविले आहे. 

निधी यांनी जानेवारीमध्ये सीएएच्या समर्थनार्थ भाजपाने काढलेल्या मोर्चामध्ये प्रिया वर्मा यांच्याशी वाईट वागणाऱ्या भाजपाच्या नेत्याच्या कानशिलात हाणली होती. यामुळे वाद निर्माण झाल्याने शिवराज यांनी दोन्ही अधिकाऱ्यांवर सरकारच्या समर्थनात काम केल्याचा आरोप केला होता. आता त्यांचे सरकार य़ेताच शिवराज यांनी दोन्ही अधिकाऱ्यांविरोधात कारवाई केली आहे. 

काय होते प्रकरण राजगढ जिल्ह्यातील ब्यावरामध्ये १९ जानेवारीला नागरिकता संशोधन कायदा सीएएच्या समर्थनासाठी रॅली काढण्यात आली होती. यावेळी तेथे एका भाजपाच्या कार्यकर्त्याला जिल्हाधिकारी निधी निवेदिता यांनी थोबाडीत मारली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये आंदोलक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाली होती. याचवेळी उप जिल्हाधिकारी प्रिय़ा वर्मा यांची आंदोलकांबरोबर धक्काबुक्कीही झाली. यामुळे निवेदिता यांनी पोलिस उपनिरिक्षकाच्याही कानाखाली मारले होते. तपासामध्ये ही तक्रार खरी असल्याचे पुढे आले. 

यानंतर शिवराजसिंह यांनी ट्विट करत आरोप केले होते. राजगढ जिल्हाधिकाऱ्यांनी सीमा ओलांडली असून आधी संसदेत बनलेल्या कायद्याच्या समर्थनार्थ निघालेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना मारले. नंतर त्यांनी एका पोलिस अधिकाऱ्यालाही मारले. कमलनाथ यांना माझा प्रश्न आहे की त्यांना वाचविणार की कारवाई करणार?

महिला अधिकाऱ्याचे कपडे फाडायचा प्रयत्नप्रिया यांनी बचावावेळी सांगितले की, आंदोलकांनी दंगा सुरु केला होता. त्यांनी कार्यकारी दंडाधिकारी आणि माझे कपडे ओढायला सुरुवात केली होती. आम्ही त्यांना पोलिस ठाण्यामध्ये येण्याची सूचना करत होतो. मात्र, ते झटके देऊन पळून जात होते. कोणीतरी पाठीमागून माझ्यावर जोरात लाथ मारली. लोकांना मी तरीही तिथेच बसण्यास सांगितले. ते बसलेही. परंतू एक व्यक्ती शिव्या घालत मागून धावत आला. त्याला आवरण्याचा प्रयत्न केला, त्याने अपशब्द वापरल्याने त्याला कानशिलात हाणले. यानंतर लोकांनी माझा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. 

टॅग्स :shivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानMadhya Pradeshमध्य प्रदेश