उत्तर प्रदेशमधील कन्नौज रेल्वे स्टेशनवर सुरू असलेल्या सौंदर्यीकरणाच्या कामादरम्यान, मोठी दुर्घटना घडली आहे. स्टेशनच्या दोन मजल्यांवरील स्लॅब कोसळून त्याच्या ढिगाऱ्याखाली अनेक कामगार अडकले आहेत. आतापर्यंत या कामगारांपैकी १२ जणांची सुटका करण्यात यश आलं आहे. तर अनेक कामगार अद्याप ढिगाऱ्या खाली अडकून पडले असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचाव कार्यास सुरुवात केली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना स्थानिक प्रशासनाने सांगितले की, या अपघातानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांपैकी काही जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकलेले असण्याची शक्यता आहे. त्यांचा शोध घेतला जात आहे. रेल्वे स्टेशनवर सुरू असलेल्या सौंदर्यीकरणाच्या कामादरम्यान हा अरघात झाला आहे. ही घटना घडली तेव्हा स्लॅब कोसळण्याचा मोठा आवाज झाला होता.