शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

भारतात यंदा समाधानकारक पाऊस पडणार; स्कायमेटचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 09:55 IST

जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात सरासरी 887 मिमी पाऊस पडेल

मुंबई: भारतात यंदा समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज स्कायमेट या संस्थेने वर्तवला आहे. 'स्कायमेट'ने दिलेल्या माहितीनुसार, 2018 मध्ये नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनची दीर्घकाळातील सरासरी ही समाधानकारक राहील. यामध्ये थोडेफार बदल होऊ शकतात. मात्र, या गोष्टी वगळता जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात सरासरी 887 मिमी पाऊस पडेल, असे 'स्कायमेट'ने म्हटले आहे.

भारतातील बहुतांश शेती आणि पर्यायाने इतर उद्योगधंदे पावसाच्या गणितावर अवलंबून असतात. त्यामुळे हवामान खात्याच्या पावसाविषयीच्या अंदाजाकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले असते. या अंदांजावर बाजारपेठेत अनेक चढउतारही पाहायला मिळतात. साहजिकच स्कायमेटने आज जाहीर केलेल्या अंदाजामुळे शेतकरी आणि उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, भोपाळ, इंदौर, जबलपूर आणि रायपूर या शहरांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असे स्कायमेटने म्हटले आहे. तर अहमदाबाद, वडोदरा, राजकोट आणि सुरत या शहरांमध्ये सरासरी इतका पाऊस पडेल. जून ते सप्टेंबर या कालावधीत सर्वाधिक पाऊस जून आणि सप्टेंबरमध्ये पडणार, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, मान्सूनचे संभावित वितरण

• ५% शक्यता जास्त पावसाची (हंगामी पाऊस ११०% पेक्षा जास्त आहे)• २०% शक्यता सामान्यपेक्षा अधिक पावसाची (हंगामी पर्जन्य १०५% ते ११०% च्या दरम्यान)• ५५% शक्यता सर्वसाधारण पाऊस होण्याची (हंगामी पर्जन्यमान ९६ ते १०४% च्या दरम्यान)• २०% शक्यता सामान्यपेक्षा कमी पाऊस होण्याची (हंगामी पर्जन्य ९०% ते ९५% च्या दरम्यान)• ०% शक्यता दुष्काळ होण्याची (हंगामी पाऊस ९०% पेक्षा कमी)

पावसाचे मासिक वितरण

जून - दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत १११% (जूनसाठी दीर्घकालीन सरासरी = १६४ मिमी)

• सामान्य पावसाची ३०% शक्यता• सामान्यपेक्षा जास्त पावसाची ६०% शक्यता• सामान्यपेक्षा कमी पाऊस होण्याची १०% शक्यता

जुलै - दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत ९७% (जुलैसाठी दीर्घकालीन सरासरी = २८९ मिमी)

• सामान्य पावसाची ५५% शक्यता• सामान्यपेक्षा जास्त पावसाची १५% शक्यता• सामान्यपेक्षा कमी पाऊस होण्याची ३०% शक्यता

ऑगस्ट- दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत ९६% (ऑगस्ट साठी दीर्घकालीन सरासरी = २६१ मिमी)

• सामान्य पावसाची ५५% शक्यता• सामान्यपेक्षा जास्त पावसाची १०% शक्यता• सामान्यपेक्षा कमी पाऊस होण्याची ३५% शक्यता

सप्टेंबर- दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत १०१% (सप्टेंबर साठी दीर्घकालीन सरासरी = १७३ मिमी)

• सामान्य पावसाची ६०% शक्यता• सामान्यपेक्षा जास्त पावसाची २०% शक्यता• सामान्यपेक्षा कमी पाऊस होण्याची २०% शक्यता 

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Rainपाऊस