शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
4
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
5
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
6
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
7
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
8
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
9
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
10
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
11
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
12
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
13
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
14
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
15
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
16
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
17
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
18
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
19
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
20
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी

सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 18:27 IST

Sikkim Assembly Election : सिक्कीम विधानसभा निवडणुकीत सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने सलग दुसऱ्यांदा दणदणीत विजय मिळवला आहे.

Sikkim Assembly Election Result 2024: रविवारी झालेल्या मतमोजणीत अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभेचे निकाल हाती आले आहेत. अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. मात्र सिक्कीममध्ये भाजपला दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने सलग दुसऱ्यांदा दणदणीत विजय मिळवून सिक्कीममध्ये पुन्हा सत्ता मिळवली आहे. मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांच्या नेतृत्वाखालील सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने विधानसभेत ३२ पैकी ३१ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे भाजपाला सिक्कीममध्ये एकही उमेदवार निवडून आणता आलेला नाही.

सिक्कीममध्ये प्रेमसिंग तमांग यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा आणि पवन कुमार चामलिंग यांच्या नेतृत्वाखालील सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट यांच्यात मुख्य लढत होती. सिक्कीममध्ये भाजप आणि काँग्रेसनेही आपले उमेदवार उभे केले होते. १४६ उमेदवारांमध्ये मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग, कृष्णा कुमारी राय, माजी मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग, माजी भारतीय फुटबॉलपटू बायचुंग भुतिया आणि भाजपचे नरेंद्र कुमार सुब्बा या प्रमुख उमेदवारांचा समावेश होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत प्रेम सिंग तमांग यांच्या नेतृत्वाखालील सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने १७ तर सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट १५ जागा जिंकल्या होत्या. मात्र यावेळी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने तब्बल ३१ जागांवर विजय मिळवला आहे. तर एसडीएफला केवळ शायरी मतदारसंघातून विजय मिळवता आला आहे.

विरोधी पक्षाचा एकच आमदार

सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाला प्रचंड बहुमत मिळाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या पक्षाने ३१ जागा जिंकून ऐतिहासिक बहुमत मिळवले आहे. विरोधी पक्ष एसडीएफला केवळ १ जागा जिंकता आली आहे. त्यामुळे सिक्कीम विधानसभेत विरोधी पक्षाचा एकच आमदार बसणार आहे. तसेच सिक्कीमचे पाच वेळा मुख्यमंत्री राहिलेले एसडीएफचे प्रमुख पवन कुमार चामलिंग यांचाही विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. दुसरीकडे, भाजपला एकही जागा मिळालेली नाही.सिक्कीम भाजपाचे अध्यक्ष दिल्ली राम थापा यांनाही पराभव पत्करावा लागला. थापा हे २ हजार ९६८ मतांनी पराभूत झालेत.

दुसरीकडे, अरुणाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. पुन्हा एकदा भाजप पूर्ण बहुमताने सत्तेत आला आहे. भाजपने ४६ जागा जिंकल्या आहेत ज्या २०१९ च्या निवडणुकीतल्या जागांपेक्षा जास्त आहेत. एनपीईपीला ५ तर काँग्रेसला फक्त १ जागा मिळाली आहे. तर इतरांना ८ जागा मिळाल्या आहेत.

टॅग्स :sikkimसिक्किमSikkim Democratic Frontसिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंटBJPभाजपाSikkim Revolutionary Frontसिक्कीम क्रांतिकारी मोर्चा