कर्वेत सहा गोण्या कचरा एकत्र
By Admin | Updated: August 27, 2015 23:45 IST2015-08-27T23:45:11+5:302015-08-27T23:45:11+5:30
काणकोण : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियान या स्वच्छता मोहिमेअंतर्गत व काणकोणचे आमदार तथा गोव्याचे मंत्री रमेश तवडकर यांनी सुरू केलेल्या स्वच्छ गोवा नितळ काणकोण या कार्यक्रमाची स्फूर्ती घेऊन गावडोंगरी-कर्वे येथील तिरंगा स्पोर्ट्स क्लबने नुकतीच कर्वे येथे स्वच्छता मोहीम राबविली होती. या मोहिमेत क्लबच्या सुमारे 40 सभासदांनी भाग घेतला होता. या वेळी कर्वे येथील वाड्यावर, तसेच प्रत्येक घराशेजारी साफसफाई करण्यात आली.

कर्वेत सहा गोण्या कचरा एकत्र
क णकोण : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियान या स्वच्छता मोहिमेअंतर्गत व काणकोणचे आमदार तथा गोव्याचे मंत्री रमेश तवडकर यांनी सुरू केलेल्या स्वच्छ गोवा नितळ काणकोण या कार्यक्रमाची स्फूर्ती घेऊन गावडोंगरी-कर्वे येथील तिरंगा स्पोर्ट्स क्लबने नुकतीच कर्वे येथे स्वच्छता मोहीम राबविली होती. या मोहिमेत क्लबच्या सुमारे 40 सभासदांनी भाग घेतला होता. या वेळी कर्वे येथील वाड्यावर, तसेच प्रत्येक घराशेजारी साफसफाई करण्यात आली.या वेळी संस्थेचे अध्यक्ष दामोदर वेळीप व सचिव मनोज वेळीप यांनी स्वच्छतेसंबंधी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)ढँ3 : 2708-टअफ-01कॅप्शन: कर्वे येथे गोळा करण्यात आलेल्या कचर्याच्या गोण्यासमवेत तिरंगा स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी. (छाया: संजय कोमरपंत)