सहा विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू
By Admin | Updated: January 2, 2015 02:23 IST2015-01-02T02:23:57+5:302015-01-02T02:23:57+5:30
नववर्षाचा आनंद साजरा करून परत येत असलेल्या अभियांत्रिकीच्या सहा विद्यार्थ्यांचा गुरुवारी पहाटे रस्ता अपघातात मृत्यू झाला. केरळच्या थिरुवनंतपुरम जिल्ह्यातील छत्तानूर येथे ही दुर्घटना घडली.

सहा विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू
कोल्लम : नववर्षाचा आनंद साजरा करून परत येत असलेल्या अभियांत्रिकीच्या सहा विद्यार्थ्यांचा गुरुवारी पहाटे रस्ता अपघातात मृत्यू झाला. केरळच्या थिरुवनंतपुरम जिल्ह्यातील छत्तानूर येथे ही दुर्घटना घडली.
हे विद्यार्थी नववर्ष साजरे करण्यासाठी वरकाला बीच रिसोर्टवर गेले होते. ते पहाटे पार्टी आटोपून महाविद्यालयाच्या कॅम्पसकडे परत येत असताना त्यांची कार समोरून येत असलेल्या एलपीजी टँकरवर आदळली.
या अपघातात सहा विद्यार्थी जागीच ठार झाले तर एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला. नंतर त्याचा रुग्णालयाच्या वाटेवर मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. हे सर्व एका खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील बी. ई. तृतीय वर्षाचे विद्यार्थी होते. (वृत्तसंस्था)