दहशतवादी हल्ल्यात आसाम रायफल्सचे 6 जवान शहीद
By Admin | Updated: May 22, 2016 20:02 IST2016-05-22T20:02:53+5:302016-05-22T20:02:53+5:30
चंदेलमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत आसाम रायफल्सचे 6 जवान शहीद झालेत.

दहशतवादी हल्ल्यात आसाम रायफल्सचे 6 जवान शहीद
ऑनलाइन लोकमत,
मणिपूर, दि. 22- चंदेलमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत आसाम रायफल्सचे 6 जवान शहीद झालेत. हेंगशी आणि तुझ्यांग गावादरम्यान झालेल्या भूस्खलनाचा आढावा घेत असताना जवानांवर हा हल्ला करण्यात आला.
एनडीटीव्हीच्या माहितीनुसार, दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान दहशतवादी आणि आसाम रायफल्सचे जवान यांच्या चकमक झाली. या चकमकीत 6 जवानांनी वीरमरण पत्करलं आहे. ज्युनिअर कमांडिंग ऑफिसरसह '29 आसाम रायफल्स'च्या जवानांवर हा हल्ला करण्यात आला.
या हल्ल्यानंतर जवानांकडील एके 47 रायफल्स, एलएमजी रायफल्स, आणि दारूगोळा घेऊन दहशतवाद्यांनी पळ काढला आहे. हे दहशतवादी कॉरकॉम या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे.