शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळळा, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
2
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
3
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
4
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
5
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
6
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
7
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
8
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
9
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
10
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
11
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
12
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
13
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
14
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
15
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
16
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
17
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
18
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
19
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
20
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल

गुजरातमध्ये अडकलेले १५०० खलाशी नारगोल बंदरात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 01:28 IST

९३ कामगारांना डहाणूत उतरवले : तपासणीसाठी घेतले ताब्यात

पालघर/बोर्डी : गुजरातच्या मांगलोर बंदरात अडकलेल्या १७ ट्रॉलर्समधून सुमारे १५०० खलाशी कामगार रविवारी गुजरातच्या नारगोल बंदरात दाखल झाले. त्यातील ९३ कामगारांना डहाणू तालुक्याच्या किनाऱ्यावर उतरविण्यात आले असून तपासणीसाठी त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच आपल्या कुटुंबाच्या ओढीने घरी येण्यासाठी २० ट्रॉलर्समधून १५०० ते दोन हजार खलाशी सोमवारी येण्याच्या मार्गावर असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, ट्रॉलर्स मालकांनी कुठलीही परवानगी न घेतल्याने गुन्हा दाखल करून ती ट्रॉलर्स जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतली आहे.

गुजरातच्या पोरबंदर, ओखा, वेरावल तर सौराष्ट्रमधील मांगलोर येथील बंदरात खलाशी कामगार म्हणून रोजगारासाठी गेलेल्या १८०० कामगारांना ४ एप्रिल रोजी नारगोलच्या बंदरात उतरविण्यात आले होते. त्यातील १,१२२ खलाशी गुजरातमधील तर १०० ते १५० खलाशांना त्यांच्या जिल्हा प्रशासनाने स्वीकारले होते. मात्र, पालघर जिल्ह्यातील ५०० ते ६०० कामगारांना महाराष्ट्र सरकारने स्वीकारण्यास परवानगी नाकारल्याने त्यांना माघारी पोरबंदरमध्ये परतावे लागले होते. आपल्या सुटकेसाठी कुठलेच प्रयत्न केले जात नसल्याने त्या खलाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा माघारी आणण्यासाठी गुजरात सरकारशी बोलत असल्याचे सांगितले जात असताना कुठल्याही हालचाली न झाल्याने गुजरातच्या बंदरात काही खलाशांचा उद्रेक होत जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. मात्र, आता शनिवारी सौराष्ट्रजवळील मांगलोर बंदरातून १४ ट्रॉलर्समधून १४५५ खलाशी नारगोल बंदराकडे रवाना झाले होते. रविवारी दुपारी या ट्रॉलर्समधून १३६२ कामगारांना नारगोल बंदरातील प्रशासनाने आपल्या ताब्यात घेतले. तर ‘जय वेरावली कृपा’ ही ट्रॉलर्स पालघरच्या झाई बंदरात आणण्यात येऊन त्यातून ९३ कामगारांना उतरविण्यात आले.या वेळी ‘भारत माता की जय’च्या घोषणा या कामगारांनी आपल्या बंदरात आल्यावर दिल्या. डहाणूचे उपजिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी घटनास्थळी भेट देत या सर्व कामगारांची तपासणी करण्यासाठी त्यांना ताब्यात घेतले. या वेळी खासदार राजेंद्र गावित, आमदार विनोद निकोले, माजी आमदार पास्कल धनारे, तहसीलदार स्वाती घोंगडे आदी उपस्थित होते.ट्रॉलर्स मालकाविरोधात गुन्हा दाखलविनापरवानगी आपल्या भागात आल्याचा ठपका ठेवीत उपजिल्हाधिकाऱ्यांनी त्या ट्रॉलर्स मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आपल्या घराच्या ओढीने वेरावल बंदरातून १३, तर ओखा बंदरातून ७ अशा एकूण २० ट्रॉलर्समधून सुमारे १६०० कामगार नारगोल व पालघरकडे निघाले आहेत. 

टॅग्स :Gujaratगुजरातcorona virusकोरोना वायरस बातम्या