सहा जण, साडेसहा फुटी डोसा, गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डनं दखल घेण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 17:36 IST2017-10-24T05:18:58+5:302017-10-24T17:36:00+5:30
डोसा हा प्रकार आपण सर्रास खातो. त्याचे असंख्य प्रकार आहेत आणि कित्येक जणांनी प्रचंड आकाराचे डोसे बनवून आपलं नाव गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये यावं, म्हणून प्रयत्नही केले आहेत.

सहा जण, साडेसहा फुटी डोसा, गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डनं दखल घेण्याची मागणी
डोसा हा प्रकार आपण सर्रास खातो. त्याचे असंख्य प्रकार आहेत आणि कित्येक जणांनी प्रचंड आकाराचे डोसे बनवून आपलं नाव गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये यावं, म्हणून प्रयत्नही केले आहेत. गुजरातमध्ये एकदा २५ फुटी, एकदा ५३ फुटी डोसा बनवण्यात आला. पण रेस्टॉरंटमध्ये तो बनवला नव्हता. रेस्टॉरंटमध्ये बनवला जाणारा डोसा फार तर दीड फूट लांब असतो. पण दिल्लीतील एका हॉटेलमालकाने साडेसहा फूट आकाराचा डोसा बनवला. त्याच्या हॉटेलात सहा मित्र आले. त्या सर्वांनी डोशाचीच आॅर्डर दिली. त्यांना वेगवगळे डोसे देण्यापेक्षा एकच मोठा डोसा द्यावा, असं सागर रेस्टॉरंटचे मालक शेखर कुमार यांच्या डोक्यात आलं. त्या मित्रांनाही कल्पना खूपच आवडली. त्यांनी हा डोसा बनवला. रेस्टॉरंटमध्ये बनवलेला हा सर्वात मोठा डोसा असावा. यापुढे आठ व दहा फूट आकाराचा डोसा बनवण्याचं ठरवलं आहे. गिनीज बुकमध्ये नोंद व्हावी, अशी त्यांची इच्छा आहे.