शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
3
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
4
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
5
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
6
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
7
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
8
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
9
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
10
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
11
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
12
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
13
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
14
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
15
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
16
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
17
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
18
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
19
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
20
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगडमध्ये पुन्हा नक्षलवादी हल्ला, बीजापूर येथे आयईडी स्फोटात चार जवानांसह सहा जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 11:10 IST

छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रक्रियेत अडथळे आणण्यासाठी माओवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात हिंसक कारवाया करण्यात येत आहेत.

ठळक मुद्देछत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रक्रियेत अडथळे आणण्यासाठी माओवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात हिंसक कारवाया करण्यात येत आहेतबुधवारी सकाळी बीजापूर येथे माओवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडवून केलेल्या मोठ्या हल्ल्यात बीएसएफच्या चार जवानांसह सहा जण जखमी झाले

रायपूर - छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रक्रियेत अडथळे आणण्यासाठी माओवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात हिंसक कारवाया करण्यात येत आहेत.  बुधवारी सकाळी बीजापूर येथे माओवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडवून केलेल्या मोठ्या हल्ल्यात बीएसएफच्या चार जवानांसह सहा जण जखमी झाले आहेत. तसेच एक डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड आणि एक नागरिकही या हल्ल्यात जखमी झाला आहे. या परिसरात सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू असून, परिस्थिती नियंत्रणात आहे. मिळालेल्या माहितीनुसार छत्तीसगडमधील बीजापूरपासून सुमारे सात किमी अंतरावर असलेल्या बीजापूर घट्टी येथे आयईडीचा स्फोट झाला. या स्फोटात सीमा सुरक्षा दलाचे चार जवान जखमी झाले. तसेच एक डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड आणि एक नागरिकही जखमी झाला. स्फोटात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान, नक्षलविरोधी ऑपरेशनचे डीआयजी पी. सुंदरराज यांनी या हल्ल्ल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, ''सुरक्षा दले आणि नक्षलवाद्यांमध्ये अद्याप गोळीबार सुरू आहे. मात्र परिस्थिती नियंत्रणात आहे. सध्या छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुका सुरू आहेत. तसेच पहिल्या फेरीमध्ये नक्षलवाद्यांकडून होणाऱ्या हिंसक कारवायांना धुडकावून लावत सर्वसामान्य  मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केले होते.  

 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीChhattisgarh Assembly Election 2018छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018Chhattisgarhछत्तीसगड