सुधारित पोलीस कॉन्स्टेबलच्या हत्येबद्दल सहा जणांना जन्मठेप
By Admin | Updated: February 13, 2015 00:38 IST2015-02-13T00:38:28+5:302015-02-13T00:38:28+5:30
मुझफ्फरनगर : पोलीस पथकावर हल्ला करून एका कॉन्स्टेबलची हत्या केल्याप्रकरणी स्थानिक न्यायालयाने दोन महिलांसह एकाच कुटुंबातील सहाजणांना जन्मठेप ठोठावण्यात आली आहे. या कुटुंबातील मनोज नावाच्या इसमाला पोलीस घेऊन जात असताना त्याची मुक्तता करण्यासाठी संपूर्ण कुटुंबाने पोलीस पथकावर हल्ला चढविला होता.

सुधारित पोलीस कॉन्स्टेबलच्या हत्येबद्दल सहा जणांना जन्मठेप
म झफ्फरनगर : पोलीस पथकावर हल्ला करून एका कॉन्स्टेबलची हत्या केल्याप्रकरणी स्थानिक न्यायालयाने दोन महिलांसह एकाच कुटुंबातील सहाजणांना जन्मठेप ठोठावण्यात आली आहे. या कुटुंबातील मनोज नावाच्या इसमाला पोलीस घेऊन जात असताना त्याची मुक्तता करण्यासाठी संपूर्ण कुटुंबाने पोलीस पथकावर हल्ला चढविला होता.अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश मयंक चौहान यांनी या सर्वांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. शिवाय प्रत्येकाला ६६ हजार रुपयांचा दंडही ठोठावला. मुझफ्फरनगर जिल्ह्यात भांडुरे या गावी ५ मे २००६ रोजी मनोजच्या कुटुंबीयांनी ब्रह्मसिंग या पोलीस कॉन्स्टेबलला ठार मारले होते. दंडाची निम्मी रक्कम ब्रह्मसिंग यांच्या कुटुंबीयांना भरपाई म्हणून दिली जाणार आहे.