लोकसभेत काँग्रेसच्या सहा खासदारांचं निलंबन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 14:38 IST2017-07-24T14:33:06+5:302017-07-24T14:38:18+5:30

सभागृहामधील कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी सर्व खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे

Six MPs suspended in Lok Sabha | लोकसभेत काँग्रेसच्या सहा खासदारांचं निलंबन

लोकसभेत काँग्रेसच्या सहा खासदारांचं निलंबन

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - लोकसभेत काँग्रेसच्या सहा खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. झिरो अवरमध्ये खासदारांनी पेपर फाडून, लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांच्या दिशेने भिरकावले. सभागृहामधील कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी सर्व खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये जी गोगोई, के सुरेश, अधिरंजन चौधरी, रणजीत रंजन, सुश्मिता देव आणि एमके राघवन यांची नावे आहेत. पाच दिवसांसाठी या खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 
 

Web Title: Six MPs suspended in Lok Sabha