बिहारमध्ये सहा दलित महिलेवर सामूहिक बलात्कार
By Admin | Updated: October 10, 2014 19:29 IST2014-10-10T19:29:01+5:302014-10-10T19:29:01+5:30
बिहारमधील भोजपूर जिल्हयात सहा दलित महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बलात्कार पीडितांमध्ये तीन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे.

बिहारमध्ये सहा दलित महिलेवर सामूहिक बलात्कार
>ऑनलाइन लोकमत
पटना, दि. १० - बिहारमधील भोजपूर जिल्हयात सहा दलित महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बलात्कार पीडितांमध्ये तीन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे.
काबाडकष्ट करून पोट भरणा-या या महिला गवत विकण्यासाठी शहराकडे गेल्या होत्या. परंतू गवत लवकर विकले गेले नसल्याने त्यांना घरी येण्यास उशीर झाला. घराकडे परतत असताना अंधाराचा गैरफायदा घेत गावातील काही जणांनी या महिलेवर सामूहिक बलात्कार केला. ही घटना बुधवारी घडली. प्रारंभी याची वाच्यता करण्यात आली नाही परंतू महिलांनी पुढे येत गुरूवारी पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार नोंदवली. ही घटना भाकप (माले )च्या कार्यकर्त्यांना समजल्यानंतर त्यांनी या घटनेविरूध्द आवाज उठविला. वैद्यकीय तपासणीनंतर सहा महिलेवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बलात्कारप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केल्याची माहिती दिली असून पीडित महिलांना प्रशासनाकडून ९० हजारांची मदत देण्यात आली आहे.