शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरातील पुजाऱ्यांच्या यादीत सहा दलितांचा सहभाग; केरळच्या त्रावणकोर देवस्वाम भरती बोर्डाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 09:03 IST

त्रावणकोर देवस्वाम भरती मंडळाने महत्त्वाचा निर्णय घेऊन इतिहास तयार केला आहे.

ठळक मुद्देत्रावणकोर देवस्वाम भरती मंडळाने महत्त्वाचा निर्णय घेऊन इतिहास तयार केला आहे. देवस्वाम भरती बोर्डाकडून पुजाऱ्यांच्या यादीत सहा दलित व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. लेखी परीक्षा आणि मुलाखत घेऊन राज्य सार्वजनिक सेवा आयोगाकडून ही नेमणूक करण्यात आली आहे.

हिरुवनंतपुरम- तिरूअनंतपुरममधील प्रसिद्ध त्रावणकोर मंदिराकडून ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. त्रावणकोर देवस्वाम भरती मंडळाने महत्त्वाचा निर्णय घेऊन इतिहास तयार केला आहे. या देवस्वाम भरती बोर्डाकडून पुजाऱ्यांच्या यादीत सहा दलित व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. मंदिरासाठी तयार करण्यात आलेल्या पुरोहितांच्या यादीत ब्राम्हणेतर 36 इतर जातीच्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला. यामधील सहा जण दलित आहेत. त्रावणकोर मंदिर प्रशासनाने याआधी ब्राम्हणांव्यतिरिक्त इतर जातींच्या व्यक्तींची पुजारी म्हणून नेमणूक केली होती.पण यंदा पहिल्यांदाच दलित व्यक्तींची निवड पुजारी म्हणून करण्यात आली आहे. समितीने सहा दलितांची पुजारी पदासाठी निवड केली आहे. 

तिरूअनंतपुरममधील त्रावणकोर मंदिराच्या निवड समितीने गुरूवारी 62 पुजाऱ्यांची यादी निश्चित केली आहे. त्यामध्ये 36 जण इतर जातींचे आहेत. लेखी परीक्षा आणि मुलाखत घेऊन राज्य सार्वजनिक सेवा आयोगाकडून ही नेमणूक करण्यात आली आहे. आत्तापर्यंत त्रावणकोर मंदिर प्रशासनाकडून पुजाऱ्यांची नेमणूक केली जात होती, त्यामुळे ब्राम्हणेतर इतर जातीच्या व्यक्तींच्या शेवटच्या यादीत सहभाग होत नव्हता. या नव्या यादीत 26 ब्राम्हण पुरोहितांचा सहभाग आहे.

'ब्राम्हणेतर व्यक्तींच्या नियुक्तीला आमचा विरोध नाही. पण ज्या लोकांची पुजारी म्हणून नियुक्ती झाली त्यांना तांत्रिक मंत्रांची व्यवस्थित माहिती असावी. आरक्षणाच्या निकषांवर नियुक्ती व्हायला नको. तुमचं ज्ञान आणि मंदिराकडून आत्मसात केलेल्या प्रणालीवरील विश्वासावर निवड होणं अपेक्षित आहे, असं ऑल इंडिया ब्राम्हण फेडरेशनचे अक्कीरामण कालिदासन भट्टाथ्रीरीपद यांनी म्हंटलं आहे. 

देवस्वाम कोर्डाचे मंत्री कडकमपल्ली सुरेन्द्रन यांनी मेरिटच्या आधारे पुजाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले होते. याचं निर्देशांचं  पालन करून लेखी परीक्षा घेण्यात आली होती. लेखी परीक्षेच्या आधारे मेरिट लिस्ट आणि आरक्षणाची लिस्ट तयार करण्यात आली. 

बोर्डाचे चेअरमन राजागोपालन नायर यांच्या माहितीनुसार, एससी, एसटी आणि इतर वर्गातील व्यक्तीना मंदिरात पुजारी बनवण्यासाठी आरक्षण देण्यात आल्याची ही पहिलीच वेळ आहे. मेरिट लिस्टच्या आधारे त्यांनी आपली जागा बनविली आहे. त्रावणकोर देवस्वाम बोर्ड 1949मध्ये अस्तिस्वात आला आहे. गेल्या अनेक दशकांपासून पुजाऱ्यांच्या नियुक्तीसाठी आरक्षणाची मागणी लावून धरण्यात आली होती. 

 

टॅग्स :TempleमंदिरKeralaकेरळ