पालिका लोकशाही दिनात सहा तक्रारी
By Admin | Updated: January 6, 2015 00:12 IST2015-01-05T22:04:19+5:302015-01-06T00:12:59+5:30
नाशिक : नाशिक महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लोकशाही दिनात सहा तक्रारी प्राप्त झाल्या. यावेळी पालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी प्राप्त व प्रलंबित तक्रारींबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित अधिकार्यांना दिले.

पालिका लोकशाही दिनात सहा तक्रारी
नाशिक : नाशिक महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लोकशाही दिनात सहा तक्रारी प्राप्त झाल्या. यावेळी पालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी प्राप्त व प्रलंबित तक्रारींबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित अधिकार्यांना दिले.
आयुक्तांच्या दालनाशेजारील सभागृहात आयोजित या लोकशाही दिनात सहा तक्रार अर्ज प्राप्त झाले. त्यात विद्युत विभाग, बांधकाम विभागाशी संबंधित एक, तर नगररचना विभागाशी संबंधित चार तक्रारींचा समावेश होता. यावेळी सर्व विभागांचे प्रमुख तसेच प्रशासन उपआयुक्त विजय पगार उपस्थित होते.