सहा दुचाकी चोरल्याची कबुली

By Admin | Updated: February 5, 2016 00:33 IST2016-02-05T00:33:03+5:302016-02-05T00:33:03+5:30

सहा दुचाकी चोरल्या

Six bicycle stolen confessions | सहा दुचाकी चोरल्याची कबुली

सहा दुचाकी चोरल्याची कबुली

ा दुचाकी चोरल्या
जळगाव, नशिराबाद, भुसावळ व चोपडा येथून त्याने सहा दुचाकी चोरल्याची कबुली दिली. या दुचाकी त्याने क्रमांक बदलवून दहा ते पंधरा हजार रुपयात गहाण ठेवल्या. धरणगाव येथे किरण मराठे या तरुणाला त्याने एक दुचाकी दिली होती. पोलिसांनी त्याच्याकडून दुचाकी जप्त करुन त्यालाही ताब्यात घेतले. किरणकडे त्याचे दीड हजार रुपये घेणे बाकी होते. एक दुचाकी एरंडोल येथून तर तिसरी जळगावातून जप्त केली.
दिवसा साडी विक्री रात्री चोरी
नाना धनगर हा दिवसा साडी विक्रीचा व्यवसाय करायचा तर रात्री दुचाकी चोरीचे काम करायचा. तीन महिन्यापासून तो गोपाळपुरा भागात आकाश सुर्यंवशीच्या घराजवळ भाड्याने घर घेऊन राहत होता. चोरीबाबत संशय येऊ नये यासाठी सुरत येथून साड्या आणून त्या विक्री करत असल्याचे तो म्हणाला.
इन्फो..
भावाचे ४० हजार जुगारात हरला
धरणगाव येथे राहत असताना नाना हा मोठ्या भावाचे ४० हजार रुपये जुगारात हरलो, त्यामुळे भाऊ पत्नीसह गाव सोडून गेला. त्यानंतर त्याने दुचाकी चोरीचा उद्योग सुरू केला. वर्षभरापासून हा प्रकार सुरु होता. दरम्यान, भुसावळ येथील केसरसिंग हिरामण जाधव यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच.१९ ए.व्ही.१८७९) सात ऑक्टोबर २०१४ रोजी त्याने स्वातंत्र चौकातून चोरी केली आहे.या गुन्‘ात तो फरार होता.

चोरीसाठी घेतले भाड्याने घर
नाना धनगर याने मित्र आकाश सूर्यंवशी व किशोर या दोघांना जळगावातच मानराज पार्क परिसरात तीन हजार रुपये दराने भाड्याचे घर घेऊन दिले होते. चोरी केल्यानंतर त्या वस्तू तेथेच ठेवायच्या व रात्री मुक्कामही तेथेच करायचा असा उद्योग त्याने सुरु केला होता. आकाश व किशोर हे अभियांत्रिकीचे विद्यार्थी आहेत, मात्र त्यांचा अजून तरी कोणत्या गुन्‘ात सहभाग आढळून आलेला नाही. या दोघांना तो कपडे व नवीन बुट घेऊन देत होता. खर्चासाठी पैसेही देत होता.

Web Title: Six bicycle stolen confessions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.